पुणे

हायवेवर उभ्या ट्रकला कारची धडक; बहिण व मुलगा ठार, वडील जखमी

CD

अपघातात दोन ठार प्रकरणी
सांगोल्यात ट्रकचालकावर गुन्हा

सांगोला, ता. ४ : सांगोल्यातील वाढेगाव नाका येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर हॉटेल ज्योतिर्लिंग समोर पहाटे उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मुलगा-बहीण ठार तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवेढा-सांगोला मार्गावर २४ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी युवराज एकनाथ चक्रे (वय ५२, व्यवसाय गवंडीकाम, रा. राजेंद्रनगर, मोरेवाडी रोड, करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रक क्रमांक डब्ल्यूबी २१, ३४७७ हा महामार्गाच्या लेनवर कोणताही इंडिकेटर किंवा इशारा न देता उभा करण्यात आला होता. त्यावेळी रोहित युवराज चक्रे (वय २८) हा कार क्रमांक एमएच ०९ जीएम ९६२९ चालवत असताना सदर ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादीचा मुलगा रोहित चक्रे व बहीण पूनम बबन सोरटे (वय ३९) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी युवराज चक्रे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत होऊन एक डोळा निकामी झाला असून वाहनातील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बनसोडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

IPL 2026: कोलकाताने अखेर रोखला हैदबादचा विजयरथ! रघुवंशीचं अर्धशतक, तर रहाणेची भक्कम साथ; KKR चं आव्हान जिवंत

SCROLL FOR NEXT