

Angkrish Raghuvanshi - Ajinkya Rahane | IPL 2026 | SRH vs KKR
Sakal
IPL 2026, SRH vs KKR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ४५ व्या सामन्यात रविवारी (३ मे) कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने हैदराबादला ७ विकेट्सने पराभूत केले.
हा कोलकाताचा तिसराच विजय होता. पण या विजयामुळे त्यांनी त्यांचे आव्हान जिवंत ठेवले आहे. कोलकाताचे आता ९ सामन्यांत ७ गुण झाले आहेत. मात्र हैदराबादचा हा १० सामन्यांतील चौथा पराभव ठरला. पण यानंतरही ते तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.