Sanitation campaign
Sanitation campaign Sakal
पुणे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहिम

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी - जागतिक पर्यावरण दिन व मोदी सरकार ८ वर्षपूर्ती या निमित्त सामाजिक कार्यकर्ते व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सचिव अनिल उर्फ किसन लक्ष्मण नवले यांच्या माध्यमातून वडगावशेरी परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये क्रांती मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता गणपती मंदिर क्रांतीनगर येथे पर्यावरण प्रतिज्ञा ने घेण्यात आली यावेळी सर्व पर्यावरण प्रेमींनी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याची व इतरांनाही सहभागी करून घेण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर अनिल नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वे नंबर 48/3/4 , गणेशनगर चौक परिसर व आनंद पार्क मधील रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे संकलन केले.

प्लास्टिकचा कचरामुळे विशेष करून पावसाळ्यामध्ये ड्रेनेज लाईन तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचते व नागरिकांच्या घरांमध्ये शिरते म्हणून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक कचरा इतरत्र फेकू नये व प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा असा संदेश या वेळी अनिल नवले यांच्या माध्यमातून देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे संयोजन अनिल नवले व क्रांती मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT