संस्कार ग्रुपची इमारत.
संस्कार ग्रुपची इमारत. 
पुणे

‘मोबाईल’मुळे कुंभार जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - ठेवीदारांच्या गुंतवणुकीचे हजारो कोटी रुपये हडप करून फरारी झालेल्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ कुंभारसह तिघांना इंदूरमधून अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ फरारी असलेले कुंभार पती-पत्नी आणि नातेवाइकांच्या मोबाईलवरील संवादावरून ‘टॉवर लोकेशन’द्वारे आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा माग काढला.

पिंपरीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील इंदूर येथून कुंभारसह तिघांना नुकतीच अटक केली. कुंभार दांपत्य काही दिवस पुण्यात आणि तेथून जागा बदलत बदलत मध्य प्रदेशातील इंदूर येथे गेल्या काही महिन्यांपासून राहत होते. मुलालाही तेथील शाळेतच त्यांनी प्रवेश घेतला होता. कुंभार इंदूरमध्ये ब्रोकर म्हणून काम करत होता. तेथून तो मोबाईलद्वारे नातेवाइकांशी संवाद साधत होता. 

दरम्यानच्या काळात पिंपरी पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुंभार पती-पत्नीच्या शोधार्थ दोन पथके तयार केली. त्यांनी सर्वप्रथम कुंभार मोबाईलद्वारे कुणाकुणाशी संपर्क साधतो, याचा तपास केला. त्यात कुंभार पती-पत्नी इंदूरला राहत असल्याचे आढळले. त्या आधारे पोलिसांनी प्रथम कुंभार याचा साडू रामदास बबन शिवले याला पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुंभार दांपत्याचा माग काढला. मुलाला शाळेतून घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कुंभारला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. 

या तपास कामात सायबर सेलची विशेष मदत झाली. पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र कदम, सागर काटे, प्रशांत महाले, फौजदार शरद आहेर, वसंत मुळे यांनी ही विशेष कामगिरी बजावली.

ठेवीदार बुचडे यांचीही फसवणूक
दरम्यान, मुळशीतील पहिलवान राजू बुचडे हेही ‘संस्कार’मध्ये ठेवीदार होते. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीत त्यांचा उल्लेख अनवधानाने अटक असा झाला आहे. वास्तविक बुचडे यांचीही फसवणूक झालेली आहे. अनेक ठेवीदारांना एकत्र करून या फसवणुकीबाबत आवाज उठविला असल्याचे बुचडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'साराभाई' फेम अभिनेत्री करणार भाजपमध्ये प्रवेश!

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

Russian Attack Video: रशियाच्या मिसाईल हल्ल्यात 'हॅरी पॉटरचा किल्ला' उद्धवस्त; 5 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

KVS Manian: कोटक महिंद्रा बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक मनियन यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT