Palakhi @ Kunjirwadi
Palakhi @ Kunjirwadi 
पुणे

संत तुकोबारायांच्या पालखीचे उऱुळी कांचनमध्ये जल्लोषात स्वागत; छत्रपती संभाजीराजांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन : अंगावर जलधारा अन् मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा आज (शनिवार) प्रेमळ निरोप घेतला. आणि सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी पालखीने प्रस्थान ठेवले.

थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी कोरेगाव मूळ येथील ग्रामस्थांची सेवा स्वीकारत पालखी दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचनमध्ये अकरा वाजण्याच्या सुमारास पोचली. पालखी चौधरी माथ्यावर पोचताच, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, सरपंच राजश्री वनारसे व भैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन, कार्याध्यक्ष महादेव कांचन यांनी पालखीचे स्वागत केले.

पालखी थेऊर फाट्यावर पोचताच, थेऊर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संगिता तारु, उपसरपंच भाऊसाहेब काळे, साखर कामगार संघटनेचे राज्य समन्यवयक तात्यासाहेब काळे यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी कुंजीरवाडी गावात दाखल झाली. सरपंच सुनिता धुमाळ, उपसरपंच गोरख तुपे, माजी सरपंच संतोष कुंजीर, पोलिस पाटील मिलींद कुंजीर यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखी प्रमुख  मधुकर मोरे यांचा सरपंच सुनिता धुमाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तांबे, शिवसेनेच्या हवेली विभागप्रमुख स्वप्नील कुंजीर व शाखाध्यक्ष भाऊसाहेब कुंजीर यावेळी उपस्थित होते. 

पालखी उऱुळी कांचन गावात दाखल झाल्यावर स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेश सातव, खजिनदार प्रकाश कांचन, विश्वस्त अशोक कांचन, संभाजी कांचन यानी स्वागत केले. पालखी बारा वाजनेच्या सुमारास ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसाव्यासाठी विसावली. ग्रामस्थांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात नेऊन तेथे ग्रामगुरव संजय क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पादुकांना विधीवत महाअभिषेक व आरती करून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात ठेवल्या. यावेळी उरुळी कांचन व पंचक्रोशीतील नागरिकांनी मंदिरात दर्शनास मोठी गर्दी केली होती.

खासदार संभाजीराजांची हजेरी
कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कुंजीरवाडी ते उरुळी कांचनपर्यंत पालखीत पायी चालत सहभाग नोंदविला. तसेच उरुळी कांचनच्या मंदिरातील आरतीला देखील खासदार संभाजीराजांनी हजेरी लावली. मंदिरातील गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेक-अप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT