Politics
Politics 
पुणे

पिरंगुटमध्ये सरपंच पदासाठी तिरंगी लढत

सकाळवृत्तसेवा

बावधन - मुळशी तालुक्‍याची औद्योगिक राजधानी असलेल्या पिरंगुट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत गतवेळी वापरण्यात आलेला बिनविरोध निवडीचा पॅटर्न या वेळी चालला नाही. येथे सरपंचपदासाठी दोन माजी उपसरपंच व एक माजी तंटामुक्ती अध्यक्ष या तीन उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर सदस्यांच्या तेरा जागा बिनविरोध झाल्या असून इतर चार जागांसाठी तेरा जण नशीब आजमावीत आहेत.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पिरंगुटने ५५ जणांना विभागून गावकारभारी करीत बिनविरोधाचा नवा पॅटर्न तयार केला होता. त्याचे अनुकरण काही दिवसांपूर्वी भूगाव ग्रामपंचायतीने केले. उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व ४४ इच्छुकांना संधी देऊन भूगावने ग्रामपंचायत बिनविरोध केली. पिरंगुट ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण वर्गासाठी खुले असलेल्या सरपंचाच्या एका जागेसाठी तब्बल ३७ आणि सदस्यांच्या १७ जागेसाठी १२४ उमेदवारी अर्ज आले होते. तथापि मागील पंचवार्षिकमधील कटू अनुभव लक्षात घेऊन संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी अपेक्षित गावबैठक झाली नाही.

प्रभागानुसार नात्यागोत्याचे, मैत्रीपूर्ण समझोत्याचे राजकारण झाले. त्यामुळे सदस्यपदासाठी इच्छुकांनी कार्यकाळ वाटून घेतला. तशी लिखापढी केली. त्यानंतर तेरा जागा बिनविरोध झाल्या. त्यात तेजस्वी उभे, सुवर्णा नवाळे, रेश्‍मा पवळे, सुरेखा पवळे, अश्‍विनी निकटे, छाया पवळे, श्रीकांत केदारी, सारिका केदारी, प्रवीण कुंभार, राहुल पवळे, जनाबाई गोळे, अंकुश खडके, सारिका गोळे यांना बिनविरोध काम करण्याची संधी मिळाली. तर माघारीच्या शेवटच्या दिवसाच्या नाट्यमय घडामोडींनंतर सरपंचपदासाठी ३४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता चांगदेव पवळे, राजा वाघ आणि चांगदेव निकटे हे तीन उमेदवार सरपंचपदाच्या आखाड्यात उतरले आहेत. 

तर प्रभाग एकमध्ये एका जागेसाठी विकास बाळू पवळे, राहुल मते, जितेंद्र पवळे, रवींद्र गोळे, विकास रामदास पवळे हे पाचजण रिंगणात आहेत. प्रभाग दोनमध्ये महेश वाघ, घनश्‍याम पवळे, सागर पवळे आणि तानाजी निकटे यांच्यात एका जागेसाठी लढत होणार आहे. प्रभाग तीनमध्ये लक्ष्मण निकटे आणि शिवाजी निकटे आणि प्रभाग सहामध्ये रामदास गोळे आणि सुयोग गोळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT