मुकुंदनगर - संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल अश्‍विनी भिडे-देशपांडे यांना शनिवारी ‘वत्सलाबाई भीमसेन जोशी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) पं. उपेंद्र भट,  शिल्पा जोशी, भिडे, शुभदा मुळगुंद, श्रीनिवास जोशी, मिलिंद देशपांडे आणि आनंद भाटे.
मुकुंदनगर - संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल अश्‍विनी भिडे-देशपांडे यांना शनिवारी ‘वत्सलाबाई भीमसेन जोशी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) पं. उपेंद्र भट, शिल्पा जोशी, भिडे, शुभदा मुळगुंद, श्रीनिवास जोशी, मिलिंद देशपांडे आणि आनंद भाटे. 
पुणे

Video : नादमय सर्जनाचा परमोच्च आविष्कार

सकाळ वृत्तसेवा

Sawai Gandharva 2019 : पुणे - सतार- व्हायोलिनच्या जुगलबंदीतलं चैतन्य, नृत्यातील ऊर्जा आणि तरुण कलाकारांच्या नादमय सर्जनातून संगीताचा परमोच्च आविष्कार शनिवारी सवाईमध्ये साकारला.

महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात तरुण गायक ओंकारनाथ हवालदार यांच्या गायनाने झाली. त्यांनी ‘मुलतानी’च्या विस्तारात रागाच्या वैशिष्ट्याचे अनेक पदर उलगडले आणि या रागाचा दिमाख रसिकांना दाखविला. त्यांची तिन्ही सप्तकांतील लिलया फिरत, जोरकस ताना याला भरभरून दाद मिळाली. किराणा, जयपूर आणि आग्रा घराण्याच्या गायकीचा वापर त्यांनी केला. ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग त्यांनी मराठी आणि कन्नड भाषेत सादर केला, त्यालाही रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यांच्या सादरीकरणाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना तबल्यावर केदारनाथ हवालदार आणि संवादिनीवर समीर हवालदार या दोन भावांनी साथसंगत केली.
हवालदार यांच्या रंगतदार सादरीकरणानंतर सतारवादक शाकीर खान आणि व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये यांची जुगलबंदी रंगली आणि रसिकांमध्ये चैतन्याची लहर उसळली. त्यांनी किरवाणीतलं अमूर्त लालित्य वादनातून समोर ठेवलं.

आलापामधून रागाचे तलम अंतरंग उलगडले. तबलावादक पं. विजय घाटे यांच्या साथीने झपताल, अधा त्रिताल आणि त्रिताल या रागाचे पदर खोचून नक्षीदार स्वराकृतींची पेरणी केली. त्याला प्रचंड प्रतिसाद रसिकांकडून मिळाला.स्वामी कृपाकरानंद यांनी पटदीप राग सादर करताना विलंबित एकतालात शिवसूरज आणि त्रितालात तिलक ललाटे या बंदिशींतून शैलीदार गायकीची अनुभूती दिली. त्यानंतर ‘घोर घोर गरज गरज’, ‘डिमी डिमी डिमी डमरू बाजे’ या रचना आणि ‘अबीर गुलाल उधळी तरंग’ या रचना सादर केल्या. त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे आणि तबल्यावर महेश देसाई यांनी साथसंगत केली. नृत्यांगना रिला होता यांनी ओडिशी नृत्याविष्कार पेश केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT