Sawai-Mahotsav
Sawai-Mahotsav 
पुणे

दिग्गजांच्या शिष्यांनाही सादरीकरणाची उत्सुकता

नीला शर्मा

किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित फिरोज दस्तूर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांचे शिष्य पं. चंद्रशेखर वझे यांचं गायन यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अखेरच्या दिवशी (ता. १५) होणार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मनोगत... 

माझे गुरू पं. फिरोज दस्तूर व भीमसेनजी यांच्यात स्नेहभाव होता. गुरुजी या महोत्सवात गात असत. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात मला इथं गायची संधी मिळणं हा गुरुजी आणि भीमसेनजींचाही आशीर्वादच म्हणायला हवा. मी मुळात तबलावादक. गुरुजींना तबल्यावर साथ करायचो. नंतर गाण्याकडे वळलो. पूर्वी एकदा ते विद्यार्थ्यांना शिकवत असतानाचा एक प्रसंग आठवतो. माझ्या एका गुरुबंधूला मध्येच थांबवून ते म्हणाले, ‘भीमसेन नावाचं गारुड उगीच होत नाही. गायला लागला, की तो त्याचा नसतो. स्वरांच्या जगात असतो.’ आम्हा सगळ्यांसाठी तो मोठा गुरुमंत्र होता. 

भीमसेनजींचं तानपुरे लावण्याचं कौशल्य सुविख्यात आहे. माझ्या गुरुजींचंही ते वैशिष्ट्य होतं. कधी कधी भीमसेनजी गायनाच्या आधी माझ्या गुरुजींना तानपुरे बघायला सांगायचे. हे त्यांच्यातलं परस्परांवरचं निस्सीम प्रेम, पराकोटीचा आदर पाहून आम्ही नतमस्तक व्हायचो. आता मी स्वांतसुखाय तबला वाजवतो. एरवी गाणं हेच मुख्य. मात्र ‘यांच्या तबल्यातून किराणा घराणं ऐकू येतं,’ अशी दाद कवी विंदा करंदीकर यांच्याकडून मिळाली. हळूहळू ग्वाल्हेर, आग्रा वगैरे घराण्यांची वैशिष्ट्यंही आत्मसात करत गेलो. या मंचावर भीमसेनजी व माझ्या गुरूंच्या चरणी सेवा अर्पण करणार आहे.

पतियाळा घराण्यातील विख्यात गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी त्यांची कन्या कौशिकी चक्रवर्तीसारखे अनेक शिष्य घडविले आहेत. या महोत्सवाबद्दल त्यांच्या शब्दांत...

मी अनेक संगीत महोत्सवांमधून गात आलो आहे. पण, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कला सादर करण्यातला आनंद काही वेगळाच असतो. या ठिकाणी बुजुर्गांप्रमाणेच युवा श्रोत्यांचीही उपस्थिती वाखाणण्याजोगी असते. तरुण श्रोतेही उत्तम प्रतिसाद देतात. अशा महोत्सवांमध्ये कलावंतांचं सादरीकरण बरंचसं श्रोत्यांच्या प्रतिसादावरही अवलंबून असतं. महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातले रसिक इथं हजेरी लावतात. त्यामुळे या महोत्सवात प्रस्तुती करायला मिळणं, हे कलावंतांना हवंहवंसं असतं. माझी मुलगी आणि शिष्या, कौशिकीला इथं अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. माझ्या आणखी काही शिष्यांची तयारी पाहून, त्यांनाही इथं संधी मिळेल, हा विश्‍वास वाटतो. 
बंगालमध्ये उच्च प्रतीचं शास्त्रीय संगीत जोपासलं गेलं. महाराष्ट्रातही तसंच आहे. हल्ली बदलत्या काळानुसार संगीतातही काही प्रयोग होताना दिसतात. कौशल्यावर भर दिला जातो. गांभीर्य हरवत चाललं आहे की काय, असं वाटतं. माझ्या मते, राग हा देवासारखा असतो. रागरूपाचं पावित्र्य जपायला हवं. ही मूर्ती तुम्ही आपापल्या परीने सजवा, नटवा. पण, शुद्धता जपणं हा फार मोठा गुण आहे. तरुण कलावंतांनी या गोष्टीकडं गंभीरपणे पाहायला हवं. असे महोत्सव हे थोर कलावंतांची साधना आपल्या लक्षात आणून देतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT