schedule of CET exams for various courses has been announced education pune
schedule of CET exams for various courses has been announced education pune  esakal
पुणे

Education News : विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच कला, कृषी, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण या विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात घेणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार १८ मार्च ते २३ जुलै या कालावधीत विविध टप्प्यांवर ‘सीईटी’ परीक्षा होणार आहेत. त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा ९ ते २० मे दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध अभ्यासक्रमांच्या जवळपास २० हुन अधिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या विविध सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक रविवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या जेईई, नीट, सीयुईटी, यूजीसी नेट, अशा विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. या सर्व परीक्षांसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सीईटी सेलने राज्यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले.

त्यानुसार अभियांत्रिकी (बी.ई आणि बी. टेक), कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा ९ ते १३ मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी १५ ते २० मे दरम्यान परीक्षा होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबी (५ वर्ष) यासाठी १ एप्रिलला, तर एलएलबी (३ वर्ष) यासाठी २ आणि ३ मे रोजी परीक्षा होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक याबाबत सीईटीच्या ‘https://cetcell.mahacet.org’ या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

तात्पुरत्या वेळापत्रकानुसार काही ‘सीईटी’ परीक्षांचा कालावधी

अभ्यासक्रम : सीईटी परीक्षेचा तात्पुरता कालावधी

एमबीए/एमएमएस : १८ आणि १९ मार्च

एमसीए : २५ आणि २६ मार्च

एलएलबी (५ वर्ष) : १ एप्रिल

बी.ए/बी.एस्सी बी.एड : २ एप्रिल

एलएलबी (३ वर्ष) : २ आणि ३ मे

बी.एचएमसीटी : २० एप्रिल

बी. प्लॅनिंग : २३ एप्रिल

बॅचलर ऑफ फाइन आर्ट (ऑफलाइन) : १६ एप्रिल

बी. डिझाईन : ३० एप्रिल

बी.ई/बी.टेक आणि बी.फार्म : ९ ते २० मे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुचे व्यसन अन् ED मागे लागलेल्या नेत्याला निवडून देऊ नका; अण्णा हजारेंचा केजरीवालांवर बोचरा वार

Pune Crime News : बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Panchayat 3: 'पंचायत'मधील फुलेरा गावाच्या सचिव पदाची पोस्ट रिक्त, नीना गुप्तांनी मागवले अर्ज, पोस्ट चर्चेत

KKR: 'माहीभाईचं घर दिसतंय का?' रांचीवरून विमान जात असताना उत्साही वेंकटेश अय्यरचा प्रश्न, Video होतोय व्हायरल

Fashion Designing Course : परदेशात जाऊन शिकायचंय Fashion Designing? तर या आहेत बेस्ट युनिव्हर्सिटीज

SCROLL FOR NEXT