school going students parents asked quenstions to education minister Ashish Shelar
school going students parents asked quenstions to education minister Ashish Shelar 
पुणे

शिक्षण मंत्री शेलार यांच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही पालकांनी त्यांच्याशी बोलण्याची मागणी केली. 'आठवीपर्यंत पास करायचा कायदा असताना सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने बेकायदेशीरपणे नापास केले. विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना मध्यस्थी केली होती. परंतु शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा काढून टाकले.' असे अनेक आरोप पालकांनी केले आहे.

हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशन प्रा. लि. च्या वतीने 'पढेगा भारत' हा कार्यक्रम झाला. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, आशिष शेलार, अविनाश धर्माधिकारी, राज्यसभा खासदार अमर साबळे, मेधा कुलकर्णी,  महा. राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अराफत शेख, राज्यसभा खासदार राकेश सिन्हा आदी उपस्थित होते. यावेळी काही पालकांनी कार्यक्रमात येऊन शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना  भेटण्याची विनंती केली. शिक्षण मंत्र्यांची भेट न झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्यासोबतच शेलार यांना अकरावी प्रवेशाबाबतच्या गोंधळाबाबत विचारले असता. त्यावरही ते हात जोडून निघून गेले.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT