प्रभारींवरचा ‘भार’ आचारसंहितेमुळे लांबणार
प्रभारींवरचा ‘भार’ आचारसंहितेमुळे लांबणार Sakal
पुणे

Pune : प्रभारींवरचा ‘भार’ आचारसंहितेमुळे लांबणार; विद्यापीठातील कुलसचिव, अधिष्ठाता आणि प्राध्यापकांची निवड लोकसभेनंतर

सम्राट कदम

पुणे : कुलसचिव आणि अधिष्ठाता हे कोणत्याही विद्यापीठाचे प्रशासकीय व शैक्षणिक धुरीण असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मागील दीड वर्षाहून अधिक काळ हा भार प्रभारींच्या खांद्यावर आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या दोन्ही पदांवर पूर्णवेळ अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र, आता पुन्हा लोकसभा आचारसंहितेमुळे ही भरती अजून दोन महिने लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यापीठामध्ये तब्बल १२ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती करण्यात येत आहे. त्यासाठी साडेपाच अर्ज दाखल झाले आहे. तसेच कुलसचिव आणि अधिष्ठाता पदांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांचे अर्जही प्राप्त झाले आहे.

मात्र विविध कारणाने ही भरती लांबत असून, आता शनिवारी (ता.१६) निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करणार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे आता या तीनही पदांच्या मुलाखती दोन महिने लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतरच विद्यापीठाच्या धुरिणांबाबत स्पष्टता होणार आहे.

‘कुलसचिव’साठी ३६ अर्ज

कुलसचिव पदासाठी ३६ उमेदवार इच्छुक असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्यामध्ये माजी व्यवस्थापन परिषद सदस्यांसह, माजी अधिसभा सदस्यांचाही समावेश आहे. तसेच विद्यापीठातील विभागात कार्यरत असणाऱ्या काही विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी सुद्धा कुलसचिव पदासाठी अर्ज केला आहे.

प्राप्त अर्जांपैकी २० ते २२ अर्ज पुणे जिल्ह्यातील उमेदवारांचे असून उर्वरित अर्ज नाशिक, अहमदनगर,मुंबई व कोल्हापूर येथील आहेत. तसेच अर्ज करण्यात महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. सध्या प्रभारी कुलसचिव पदाचा कार्यभार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ.विजय खरे यांच्याकडे आहे. माजी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांचा डिसेंबर २०२३ मध्ये कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर पदाचा भार डॉ.खरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT