पुणे

पिंपरी - शिक्षा म्हणून अधिकाऱयाने शिपायाकडून घेतले 100 वेळा सलाम...

मंगेश पांडे

पिंपरी : सलाम, सबको सलाम... बघणाऱ्याला सलाम... न बघणाऱ्याला सलाम... वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम... विकत घेणाऱ्याला सलाम... विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम... भाई सबको सलाम... मंगेश पाडगावकरांची ही कविता आठवण्याचे कारणही तसेच आहे. शहरातील एका वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याला नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याने सलाम न केल्याने त्यास शंभर वेळा सलाम करण्याची शिक्षा देण्याचा अजब प्रकार घडला. वरिष्ठ अधिकाऱ्याने अशाप्रकारे "खाक्‍या' दाखविल्याने सर्वच कर्मचारी अवाक्‌ झाले. 

चिंचवड येथील मुख्य कार्यालयात बाहेरील जिल्ह्यातून एका कर्मचाऱ्याची बदली झाली. रुजू होण्यासाठी संबंधित कर्मचारी चिंचवडमधील कार्यालयात सकाळी हजर झाला. कार्यालयात येण्याची या कर्मचाऱ्याची पहिलीच वेळ. तीनशे किलोमीटर दूर अंतरावरून आलेल्या या कर्मचाऱ्यासाठी कार्यालयासह अधिकारी, कर्मचारीही नवीन. कोणाशीच ओळख नाही. हातात केवळ रुजू होण्याबाबतचे पत्र. कोणाकडे जायचे, कोणाला भेटायचे अशा गोंधळलेल्या अवस्थेत हा कर्मचारी होता.

दरम्यान, या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे कार्यालयात आगमन झाले. त्यातही ते अधिकारी गणवेशात न येता साध्या वेशात आले. त्यामुळे हे वरिष्ठ अधिकारी आहेत. हे नवख्या व्यक्तीला समजणे तसे कठीणच. दरम्यान, नव्याने रुजू होण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यालादेखील हे वरिष्ठ अधिकारी असल्याची बाब लक्षात आली नाही. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्याला सलाम ठोकला नाही. ही बाब अधिकाऱ्याच्या लक्षात आली. कर्मचाऱ्याने सलाम न केल्याने अधिकाऱ्याचा पारा चढला. त्यांच्या दालनात गेल्यानंतर कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. सलाम का ठोकला नाही, अशी विचारणा केली असता कर्मचाऱ्याने नम्रपणे नमूद केली की, ""क्षमस्व, मी पहिल्यांदाच कार्यालयात आलो.

आपण साध्या गणवेशात असल्याने मला समजले नाही.'' मात्र, अधिकाऱ्याने काहीही ऐकून घेतले नाही. अधिकाऱ्याने आपला "खाक्‍या' दाखवीत त्या कर्मचाऱ्याला तब्बल शंभर वेळा सलाम ठोकण्याची अजब शिक्षा दिली. या कार्यालयाच्या दुमजली इमारतीच्या स्लॅबवर सलाम ठोकण्याच्या शिक्षेचा प्रकार बराच वेळ सुरू होता. सलाम मोजण्यासाठी आणखी एका कर्मचाऱ्याला नेमले होते. या अजब शिक्षेची कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT