003Court_Decision_h_8_0_3.jpg
003Court_Decision_h_8_0_3.jpg 
पुणे

सोनसाखळी चोरीच्या टोळीतील पाच जणांना 10 वर्षे सक्तमजुरी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील पाच जणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे.

सज्जाद गरीबशा पठाण ऊर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30), शब्बीर मिस्किन शेख ऊर्फ इराणी (वय 24), अलिम शकील पठाण (वय 21, चौघेही, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि सलीम अब्दुल शेख (वय 32, रा. भुसावळ, जि. जळगाव) यांना शिक्षा सुनावली. याबाबत भवानी पेठ येथे राहणाऱ्या 54 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 30 मार्च 2014 ला सकाळी सातच्या सुमारास भवानी पेठ येथील नेहरू रस्त्यावरून जात असताना फिर्यादींची सोनसाखळी चोरण्यात आली होती. खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादींनी त्यांची चोरलेली सोन्याची चैन ओळखल्याचा पुरावा महत्त्वाचा ठरला. 
फिर्यादी पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकी, स्वीफ्टमधून आलेल्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीच्या सोन्याची जबरी चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

खडक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यातून आरोपींवर सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरी केल्याचे अनेक गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे सप्ष्ट झाले होते. त्यांच्यावर दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT