पुणे

Loksabha 2019 : मतमोजणीसाठी स्टेडियम परिसर बंदिस्त करावा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणीसाठी होणारी गर्दी थोपविण्यासाठी स्टेडियमचा परिसर पूर्णपणे बंदिस्त करण्याची सूचना मावळ लोकसभा निवडणूक विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.

बालेवाडी येथील स्टेडियममध्ये गुरुवारी (ता. २३) मतमोजणी होणार आहे. या दिवशी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षेपेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे तेथे सुरक्षेच्या विविध उपाययोजना करण्याबाबतच्या लेखी सूचना हिंजवडी पोलिसांनी निवडणूक विभागाला केल्या होत्या. त्यानुसार द्विवेदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठविले आहे. 

म्हाळुंगे शितळादेवीनगरकडील अपुऱ्या असलेल्या भिंतीवर पत्र्याचे कंपाउंड करावे, गावातील एका मिठाईच्या दुकानाकडून बालेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड लावावेत, मेनगेटसमोर कार्यकर्त्यांसाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करावी, गेटपासून स्टेडियमच्या मागील बाजूकडील हेलिपॅडची मागील बाजू पूर्णपणे बंदिस्त करावी, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी सहा ते पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी दहा टेबलची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. प्रत्येक टेबलसाठी चार, याप्रमाणे एकूण १६ टेबलसाठी अतिरिक्त ६४ कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मतमोजणी लवकर व्हावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT