Author-Soborno-Bari
Author-Soborno-Bari 
पुणे

ओबामांनी दखल घेतलेला सात वर्षांचा लेखक देणार व्याख्यान!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अवघ्या सात वर्षे वयाच्या लेखकाने जागतिक शांततेसंबंधी विषयावर पुस्तक लिहले असून, त्यावर त्याचेच व्याख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील सभागृहात येत्या सोमवारी (ता.6) सकाळी 11 वाजता होणार आहे.

सुबर्नो बारी असे या लेखकाचे नाव आहे. त्याचे आई-वडिल बांगलादेशमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत. सुबर्नो हा जन्मत: बुद्धिमान आहे. तो केवळ सहा महिन्यांचा असताना पूर्ण वाक्ये बोलू लागला होता. दोन वर्षांचा असताना गणित आणि विज्ञानातील प्रश्न सोडवू शकत होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याच्या या कामगिरीची दखल घेतली आणि त्याला ‘लेटर ऑफ रेकग्निशन’ दिले. सुबर्नो याच्या गणित आणि विज्ञानातील प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेबद्दल हार्वर्ड विद्यापीठानेही असे पत्र देऊन त्याचा सन्मान केला आहे.

सुबर्नो याने जागतिक शांततेबाबत ‘द लव्ह’ हे पुस्तक लिहले आहे. विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात या पुस्तकावर तो स्वत: बोलणार आहे आणि श्रोत्यांशी संवाद साधणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT