मांजरी - राष्ट्रीय क्रीडा संचनालयाच्या वतीने छत्तीसगड रायपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय थ्रोबाँल स्पर्धेत येथील शंभुराजे रविंद्र नवगण याची निवड झाली आहे. तो पालिकेच्या हडपसर येथील सचिन तेंडुलकर या प्राथमिक विद्याल्यात सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
नवगन याने तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर संघाचे नेतृत्व केले आहे. रायपूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्यातील बारा विद्यार्थ्यांचा संघ पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये तो सर्वात लहान वयाचा विद्यार्थी आहे. तीन नोव्हेंबरला या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती क्रिडा शिक्षक गणेश राठोड यांनी दिली.
शंभुराजेला मुख्याध्यापक रमेश दळवी, क्रीडा शिक्षक गणेश राठोड व प्रविण गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्याचे वडील पेन्टींगचे काम करीत असून घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे उद्योजक सुदर्शन इंगळे, सागर ढोरे व गणेश ढोरे यांनी त्याला अधिकच्या खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.