पुणे

घाबरलेल्या २५ जणांची सुटका

सकाळवृत्तसेवा

पुणे - शनिवार पेठेतील एका इमारतीमधील औषधी उत्पादने व वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानास गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता आग लागली. आगीच्या धुरामुळे घाबरलेल्या २५ रहिवाशांनी इमारतीच्या टेरेसवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सात बंबांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवून या नागरिकांची सुटका केली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्‍यता आहे.

शनिवार पेठेतील मेहूणपुरा येथील जोशी संकुल या पाच मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर औषधी उत्पादनांच्या विक्रीचे दुकान आहे. गुरुवार सकाळी या दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी अग्निशामक दलास माहिती देऊन अन्य रहिवाशांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. 

दरम्यान, आगीमुळे धुराचे प्रमाण वाढल्याने घाबरलेल्या काही रहिवाशांनी इमारतीच्या टेरेसवर धाव घेऊन मदतीची मागणी केली.

अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दुकानामध्ये लागलेली आग इमारतीच्या अन्य भागांमध्ये पसरू नये, यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. औषधी उत्पादनांमुळे आगीवर नियंत्रण येण्यास अडचण येत होती. त्यामुळे जवानांनी काही वेळातच फोमचा वापर करून आग विझविली.  उपकरणांच्या साह्याने खिडक्‍यांच्या काचा फोडून धूर बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्याच वेळी टेरेसवरील  नागरिकांनाही जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, मध्यवस्तीमध्ये आग लागल्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली होती. त्यामुळे फरासखाना व विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याबरोबरच महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, पोलिस निरीक्षक सुनील कलगुटकर, किशोर नावंदे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

घडले माणुसकीचे दर्शन !
आगीमुळे इमारतीतील रहिवाशांपैकी काही जण टेरेसवर गेले होते. त्यांना शेजारील इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या पुरविल्या. तसेच तीन ते चार तास आग विझविण्यासाठी, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी झटणारे अग्निशामक दलाचे अधिकारी, जवानांसह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘जोशी संकुल’ समोरील पाटे संपदा अपार्टमेंटमधील नागरिकांनी पाणी, चहा, बिस्किटे, कोकम सरबत, जेवणासाठी पिठले-भाकरीही दिली. निवृत्त शिक्षिका स्मिता पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT