Varvand
Varvand 
पुणे

"त्यांचा' मुक्काम चक्क स्मशानात

अमर परदेशी

वरवंड (पणे) : पोटासाठी माणसामध्ये कसल्याही परिस्थितीशी दोन हात करून जुळवून घेण्याची ताकद येते. याचाच प्रत्यय नागरिकांना आला. वरवंड (ता. दौंड) येथे यात्रेनिमित्त उंट सफारीच्या व्यवसायासाठी आलेल्या उंटावाल्यांनी बायका-मुलांसमवेत आपला प्रपंच चक्क तीन दिवस स्मशानाच्या शेडमध्ये थाटला. उंटही शेडच्यासमोर बांधले आहेत.

वरवंड येथील ग्रामदैवत श्री. गोपीनाथ महाराज मंदिराचा यात्रा उत्सव नुकताच पार पडला. गावात खेळणी, मिठाई, पाळणे आदी व्यावसायिक मुक्कामी येत असतात. ते राहुटी किंवा पालमध्ये राहतात. याच दरम्यान, यंदा गावात उंट सफारीच्या व्यवसायासाठी काहीजण कुटुंबासमवेत आले होते. यात्रेत अनेकांनी उंट सफारीचा आनंद घेतला. तीन दिवस यात्रा असल्याने राहण्याची सोय कुठे, उंट बांधायचे कुठे असा प्रश्न उंटावाल्यांना पडला. मात्र, त्यांनी सर्वांना अवाक करणारी जागा शोधली. त्यांनी बायका-मुलांसह त्यांचा मुक्काम थेट स्मशानात शेडमध्ये थाटला. समोरील प्रांगणात त्यांनी उंटांना बांधण्याची सोय केली. स्वयंपाक, झोपण्याची जागा चक्क स्मशानाच्या शेडमध्येच केली. तीन दिवसांपासून लहान मुले मृतेदहाला अग्नी देण्याच्या ठिकाणीच वावरतात. मागील तीन दिवसांपासूनचे हे दृश्‍य अनेकांना वेगळा संदेश देणारे आहे. परिस्थीती माणसाला कोणतेही धाडस करायला लावते. शिवाय स्मशानभूमीत अदृश्‍य शक्ती असते ही अंधश्रद्धा दूर करण्यात मदत करणारे दृश्‍य आहे.

याबाबत उंट चालक खरात म्हणाले, ""आम्ही कित्येक वर्षांपासून उंट सफारीचे काम करतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही जुळवून घेतो. तीन दिवसांपासून येथे स्मशानभूमीत कुटुंबासमवेत मुक्कामी आहे. आम्हाला कसलीही भीती नाही. किंबहुना स्मशानभूमीत आम्हाला रात्रभर झोपही चांगली लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT