पुणे

शिर्सुफळला महसुल प्रशासनाकडील क्षेत्र वन विभागाने घेतले एकतर्फी ताब्यात

संतोष आटोळे

शिर्सुफळ - (बारामती) येथील व्यवस्थापनासाठी महसूल विभागाकडे दिलेले क्षेत्र वापरावीना अतिक्रमीत केले. जात असल्याने पुन्हा वन विभागाकडे देण्याच्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानुरुप सुमारे 34.91 हेक्टर वनक्षेत्र वनविभागाने ताब्यात घेतले. यामध्ये जिल्हाधिकारीऱ्यांनी वखार महामंडळाला दिलेल्या 18 हेक्टर जमिनीचाही समावेश आहे. या जमिनीमधील 21 गुंठे क्षेत्रात सध्या सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या गोदामाचे काम सुरु आहे.ते क्षेत्रही ताब्यात घेत काम थांबवण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेली जमिन कायदेशीर की बेकायदेशीर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि पुर्वी वनविभागाने बारामती तालुक्यातील गाडीखेल गावातील गट क्रमांक 791 मधील 22 हेक्टर 01 आर वनक्षेत्र व्यवस्थापनासाठी महसूल विभागाकडे दिले होते. त्यापैकी 7 हेक्टर 47 आर क्षेत्रात वाटप करण्यात आले. तर गट क्रमांक 792 मधील 26 हेक्टर 92 आर क्षेत्रातील 6 हेक्टर 40 आर वाटप करण्यात आले होते. उर्वरित क्षेत्राचे निर्वनीकरण झाले नव्हते. राखीव वन असाच त्याचा दर्जा होता.ते क्षेत्र परत वनविभाकडे द्यावा,असा शासनाचा आदेश होता. याबाबत वनविभागाच्या 30 जानेवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीत सर्व भागातील वन विभागाने ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुरुप गट क्रमांक 791 मधील 14 हेक्टर 54 आर व गटक्रमांक 792 मधील 20 हेक्टर 37 आर क्षेत्र वनविभागाने एकतर्फी ताब्यात घेतले.

यामध्ये विशेष बाब म्हणजे गट क्रमांक 791 व 792 मधील जमिन वन विभागाकडे असल्याचे गॅजेट असतानाही जिल्हाधिकारी यांनी सन 2012 मध्ये यामधील 18 हेक्टर 49 आर जमिन वखार महामंडळाला देण्याचा आदेश दिला आहे. यानंतर सध्या तेथे सुमारे 2 कोटी 55 लाख रुपये खर्चाच्या गोदामाचे काम अंतिम टप्प्यात आहे.मात्र आता वन विभागाने जमिन आपली असल्याने ताब्यात घेतली आहे. यामुळे काम थांबवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान जमिन परत ताब्यात घेण्याच्या आदेशाची पुण्याच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी ए, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, सहाय्यक वनसंरक्षक एम.बी.तेलंग व वैभव भालेराव यांच्या सुचनेप्रमाणे व वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शना खाली व बारामतीचे वनपाल त्रिंबक जराड, वन रक्षक अनिल खोमणे, वनमजुर अंकुश चोरमले यांनी जमिनीचा मोजनीकरुन पंचनामा केलीत ताबा घेतला.
- वन विभागाच्या गॅजेट नोटीफीकेशन नुसार ताबा - सहाय्यक वनसंरक्षक एम.बी.तेलंग (सहाय्यक वनसंरक्षक) 

शासन निर्णया याप्रमाणे वन विभागाच्या गॅजेट नोटीफीकेशन असलेल्या व निर्वनिकरण न झालेल्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत.यामध्ये शिर्सुफळ येथील 34 हेक्टर 91 आर जमिनीचा वन विभागाने एकतर्फी ताबा घेतला आहे.वखार महामंडळाला दिलेल्या जमिनी बाबत विचारले असता याबाबत त्यांचा खुलासा आल्यानंतर तपासणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

गट नंबर तपासुन करुन पुढील निर्णय..
याबाबत वखार महामंडळाचे शाखा अभियंता रवि जाधव यांना याबाबत विचारले असता कोणी ताबा घेतला असा उलट  प्रतिप्रश्न केला. तेव्हा त्यांना याबाबत वनविभागाने केलेल्या पंचनामा व काम थांबवण्याबाबत सांगितल्यावर त्यांनी पुण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह शुक्रवार (ता.15) रोजी बैठक झाली आहे.यामध्ये वन विभाग गट नंबर तपासुन त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT