Car Accident
Car Accident Sakal
पुणे

Shirur Accident : कंटेनरवर मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार

नितीन बारवकर

पुणे-नगर रस्त्यावर, कारेगाव (ता. शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले.

शिरूर - पुणे-नगर रस्त्यावर, कारेगाव (ता. शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले. मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातांत मोटारचालक गंभीर जखमी झाला.

सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले. ते मोटार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते.

दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेन च्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू पोलिसांनी क्रेन च्या सहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला, तर मोटारीत अडकून सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. कार्तिकी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नगर येथील रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मोटार चालवित असलेले अश्विन भोंडवे हे देखील जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ कारेगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

या अपघातात मृत्युमूखी पडलेले सुदाम शंकर भोंडवे हे डोमरी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील सोनदरा गुरूकुल संस्थेचे संचालक असून, त्यांचे व त्यांचा मुलगा अश्विन (या अपघातातील जखमी) हे देखील पुण्यातील शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. दोघांचेही शैक्षणिक कार्यात योगदान असून, काल त्यांच्या सोनदरा गूरूकुल संस्थेतील पालक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते कुटूंबियांसह डोमरी येथे गेले होते. तेथून ते कौटुंबिक कामानिमीत्त चाकण येथे येत असताना वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

आनंद हरपला...

सुदाम भोंडवे व त्यांच्या पत्नी सिंधुताई यांना चार वर्षीय नात आनंदी हिचा विशेष लळा होता. आनंदी च्या येण्याने त्यांचे घर खरोखर आनंदमय झाले होते. आनंदीच्या एका वाढदिवसाला सुदाम भोंडवे यांनी तीच्यावर एक काव्य केले होते. अश्विन यांचाही कन्येवर विशेष स्नेह होता. त्यांच्या फेसबुकवरून आज या आठवणी ताज्या झाल्या. आई - वडीलांचे छत्र आणि सहचारिणीच्या साथीबरोबरच; जीवनात आनंद भरणारी चिमुकली आनंदीही त्यांना आज सोडून गेल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT