Shirur Lok Sabha Constituency CM Eknath Shinde received warm welcome Landewadi pune
Shirur Lok Sabha Constituency CM Eknath Shinde received warm welcome Landewadi pune sakal
पुणे

लांडेवाडीत मुख्यमंत्री शिंदे यांचे जोरदार स्वागत

डी. के वळसे पाटील

मंचर : “शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ग्रामीण विकास, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पीएमआरडीए, सामाजिक न्याय यासह अन्य योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. आज सुचविलेल्या २५ कोटी रुपये निधीच्या कामाबाबत तसेच अन्य महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच विशेष बैठक मंत्रालयात आयोजित केली जाईल.” असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी व शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे ग्रामपंचायत ते आढळराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत बँड पथक, ढोल ताशा व डीजे लवून जोरदार स्वागत केले. आढळराव पाटील यांच्याबरोबर शिंदे यांनी भोजन घेतले.

त्यावेळी आढळराव पाटील यांनी विविध विकास कामांचे निवेदन देवून चर्चा केली. तसेच माजी आमदार (स्व) सुरेश गोरे यांनी सुचविलेल्या जागेवरच खेड पंचायत समितीचे बांधकाम होईल असे हि शिंदे यांनी सूचित केले. यावेळी कल्पना आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे, अक्षय आढळराव पाटील, सरपंच अंकुश लांडे पाटील, अरुण गिरे, सुनील बाणखेले, भाऊसाहेब सावंत पाटील, शिवा राजगुरू उपस्थित होते. भैरवनाथ पतसंस्थेच्यावतीने शिवाजीराव आढळराव पाटील, उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, हनुमंत तागड, अशोक गव्हाणे, रमेश खरमाळे यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी दिलेली निवेदने स्वीकारून शिंदे भीमाशंकरकडे मार्गस्थ झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT