Shiv Jayanti sakal
पुणे

Shiv Jayanti : ऑस्ट्रेलियातही मराठी बांधवाकडून शिवजयंती सोहळा ;राजकिय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात मराठी असोसिएशन,पर्थ या संस्थेच्या माध्यमातून रविवार ता.२५ रोजी मराठी बांधवांनी शिवजयंती उत्सव दिमाखदारपणे मोठ्या उत्साहात साजरा केला असल्याची माहिती अध्यक्ष विशाल जाधव आणि प्रसिद्धी प्रमुख अभिजित काळे यांनी सकाळशी बोलताना दिली.

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात मराठी असोसिएशन,पर्थ या संस्थेच्या माध्यमातून रविवार ता.२५ रोजी मराठी बांधवांनी शिवजयंती उत्सव दिमाखदारपणे मोठ्या उत्साहात साजरा केला असल्याची माहिती अध्यक्ष विशाल जाधव आणि प्रसिद्धी प्रमुख अभिजित काळे यांनी सकाळशी बोलताना दिली.

यावेळी मराठी बांधवांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सजवलेल्या पालखीमधुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी महिलांनी लेझीमचा खेळ खेळला.मराठी बांधव मावळ्यांच्या तसेच सांस्कृतिक पोषाखात उपस्थित होते. ऐतिहासिक शिवनाट्य, शिवव्याख्यान आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते असे मंडळाचे संस्थापकीय संचालक बॉर्डरलेस व्हाट्सएप ग्रुपचे संस्थापक दीपक सुकाळे यांनी सांगितले.

शिवजयंती उत्सवासाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक मंत्री डॉ.टोनी बुटी यांचे वतीने जंडाकोट विधानसभेचे विद्यमान आमदार याझ मुबारकाई यांनी उपस्थित राहून मराठी बांधवांना संबोधित केले.आर्मडेल शहराचे उपमहापौर जॉन कोव्ह तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.शिवजयंती उत्सवासाठी मराठी असोसिएशन पर्थची कमिटी तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur 60 kg Silver Robbery : थरारक! आरामबसवर दरोडा, ६० किलो चांदी लुटली; कोल्हापुरातील घटना, बस थेट पोलिस ठाण्यात...

Land Acquisition : पुरंदर विमानतळासाठी नववर्षात भूसंपादन; जमीन परतावा, दर वाढवून देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

BMC Election : देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर 'वंचित'ची नजर; '200 उमेदवार उतरवणार रिंगणात'; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Success Story: 19 व्या वर्षी साक्षी राहिंज इंडियन एअर फोर्समध्ये; पिंपरणेच्या लेकीची आकाशाला गवसणी, स्वप्न उतरवलं सत्यात!

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा; मुंबईच्या राजकारणाला मिळणार नवे वळण

SCROLL FOR NEXT