shiv sena mp sanjay raut meeting on 26 april at daund pune politics esakal
पुणे

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची २६ एप्रिल रोजी दौंड तालुक्यात सभा

भाजप आमदार राहुल कुल यांच्या कारखान्यातील गैरव्यवहाराची कागदोपत्री पोलखोल

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वरिष्ठ राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा दौंड तालुक्यात २६ एप्रिल रोजी होणार आहे. विधीमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष तथा दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप आमदार राहुल कुल यांच्या कारखान्यातील गैरव्यवहाराची कागदोपत्री पोलखोल या सभेत केली जाणार आहे, अशी माहिती दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांनी दिली.

दौंड शहरात रमेश थोरात यांनी ही माहिती दिली. खासदार संजय राऊत यांनी १३ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीमा साखर कारखान्यामधील गैरकारभाराच्या चौकशीची लेखी मागणी केली होती.

तसेच कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्यावर त्यांनी पाचशे कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. दरम्यान मुंबई येथे खासदार संजय राऊत यांची भेट घेत माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे व शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक शरद सूर्यवंशी यांनी त्यांना सभेसाठी निमंत्रित केले होते.

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना शेतकरी कृती समितीच्या वतीने वरवंड (ता. दौंड) येथे २६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे सभेत पोलखोल करणार आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार तथा दौंड तालुक्याचे भूमीपूत्र रवींद्र धंगेकर यांचा या वेळी सत्कार होणार आहे.

खासदार संजय राऊत यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर दौंड तालुक्यात राहुल कुल समर्थकांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढून प्रतिमा जाळल्या होत्या. जाळपोळ करण्यापेक्षा राहुल कुल यांनी चौकशीला सामोरे जात ` दूध का दूध , पानी का पानी ` , केले पाहिजे होते, अशी टीका रमेश थोरात यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT