sharad pawar
sharad pawar sakal
पुणे

Shiv Sena : चिन्ह गेल्याचा फारसा परिणाम होणार नाही- शरद पवार

मिलिंद संगई,

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही, नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल.

बारामती - निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही, नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचं नवीन चिन्ह मान्य करतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामतीत आज आल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना असे सांगितले की, यापूर्वी काँग्रेसला देखील गाय वासरू हे चिन्ह गमवावे लागले होते. हे चिन्ह गेल्यानंतर त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह स्वीकारले आणि नंतरच्या काळात लोकांनी ते चिन्ह मान्य केले.

या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांच्यावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही, असे मत व्यक्त करून शरद पवार म्हणाले की, या निर्णयाची काही दिवस चर्चा होईल आणि नंतर लोक विसरून जातील आणि नवीन चिन्ह मान्य करतील.

दरम्यान निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही असेही शरद पवार यांना नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT