वाकडेवाडी - डेअरी फार्मच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या बस स्थानकाचे अपूर्ण अवस्थेत असलेले काम.
वाकडेवाडी - डेअरी फार्मच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या बस स्थानकाचे अपूर्ण अवस्थेत असलेले काम. 
पुणे

शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर रखडले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मेट्रोच्या भूमिगत स्थानकाच्या कामासाठी शिवाजीनगर बस स्थानकाचे होणारे स्थलांतर लांबणीवर पडले आहे. वाकडेवाडी येथे तातपुर्त्या बस स्थानकाचे काम संथ गतीने सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून सुमारे दोन महिने लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवाजीनगर बस स्थानकाचे स्थलांतर या वर्षात तरी होणार का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात मेट्रोचे भूमिगत स्थानक होणार आहे. तेथून भूमिगत पादचारी मार्गही आकाशवाणीपर्यंत होणार आहे. शिवाजीनगर स्थानकाचे महामेट्रोकडून विकसन होणार आहे. त्यात मेट्रो, रेल्वे, पीएमपी आणि एसटी बससाठी व्यवस्था असेल. त्यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या टॉन्सपोर्ट हबच्या कामासाठी शिवाजीनगर बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर वाकडेवाडी येथील डेअरी फार्मच्या पाच एकर जागेवर करण्यात येणार आहे. मात्र स्थलांतराची मुदत संपून आता सहा महिने होत आली आहेत; परंतु डेअरी फार्म येथील स्थानकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.

हे काम पूर्ण होण्यास अजून साधारपणे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत तरी शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर होऊ 
शकेल का, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

दरम्यान, मेट्रोकडून शिवाजीनगर स्थानकात कामास सुरवात करण्यात आली. त्यामुळे स्थानकातून गाड्यांचे संचलन करण्यास प्रशासनास अडचणी येत आहेत. स्थानकातील सोयीसुविधांवर परिणाम झाल्याने प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT