Amol Kolhe
Amol Kolhe Sakal
पुणे

शिवनेरीवरील शंभर फुटी भगवा ध्वजासाठी परवानगी द्यावी; डॉ. कोल्हे

दत्ता म्हसकर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन शिवनेरी गडावर १०० फुटी भगवा ध्वज लावण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.

जुन्नर - श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर (Shivneri Fort) शंभर फुटी भगवा ध्वज (Bhagava Flag) लावण्यास तत्काळ परवानगी द्यावी यासाठी आवश्यकता भासल्यास नियमात बदल करा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन शिवनेरी गडावर १०० फुटी भगवा ध्वज लावण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. या संदर्भात डॉ. कोल्हे यांनी रीतसर पत्रव्यवहारही केला होता. याबाबत रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र भारतीय पुरातत्त्व विभागाकडून परवानगी देण्याबाबत दिरंगाई होत असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी पुन्हा एकदा रेड्डी यांची भेट घेऊन वरील मागणी केली आहे.

यावेळी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या प्रचलित नियमाचा परवानगी देण्यात अडसर येत असेल तर किल्ले शिवनेरीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास नियमात बदल करा अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास संसदेत हा प्रश्न उपस्थित करावा लागेल असा इशारा दिला.

खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री रेड्डी यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून लवकरच शिवनेरी गडावर भगवा ध्वज फडकताना दिसेल याची खात्री असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT