Shivsena workers pelted stones at uday samant convoy at Katraj in Pune  sakal
पुणे

Pune : गद्दार-गद्दार म्हणत शिवसैनिकांची उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात वाक् युद्ध सुरू असताना आज (मंगळवारी) पुण्यातील या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकण्यात आल्याचे समोर आले आहे.

गद्दार-गद्दार असं म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान कात्रज भागात आज आदित्य ठाकरे यांची सभा होती. याच भागातून उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना ट्राफिक खोळबंली होती, यादरम्यान शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला.

जाहीर सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेनेचे प्रमुख आदीच्या ठाकरे यांनी एकमेकांवर नाव न घेता परस्परांवर टीका केलीच. तानाजी सावंत यांनी थेट कोण आदित्य ठाकरे? असा प्रश्‍न केल्याने या दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर होते. तर आदित्य ठाकरे यांची कात्रज येथे सभा झाली. या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

‘‘शक्ती गेल्यानंतर शक्तीप्रदर्शन करुण काय उपयोग. सर्व शिवसैनिक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता काही फरक पडणार नाही. आदित्य ठाकरे आहेत तरी कोण? एका आमदाराशिवाय आता त्यांच्याकडे कोणते पद आहे.’’ अशी बोचरी टीका केल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. पुरंदर येथील सभेत विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मला एकटे पाडण्यात आले. कटकारस्थान करून मला शेजारच्यांनी पाडले, अशी टीका ठाकरे व पवार यांच्यावर टीका केली.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी समाचार घेत ‘‘पुरंदरमध्ये एक जण झोपी गेलेला आता जागा झाला आहे. बापू तुमचे हे वागणं वरं नाही, ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात मिठाचा खडा तुम्ही टाकला आहे.’’ अशी टीका शिवतारेंवर केली.

‘‘शिवसेनेची आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीतून सुटका झाली आहे, शिवसैनिकांना कोणी धक्का लावू शकणार नाही. धर्मवीर पिक्चर काहींना तो रुचला नाही. आता धर्मवीरचा पार्ट २ आणि पार्ट ३ ही येऊ शकतो. हे युती सरकार अडीच वर्षे विलंबाने आले.’’

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘‘ही सत्ता आणि सत्य यातील लढाई आहे. हा साधू संत, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, गद्दारांचा नाही. अतिवृष्टीने राज्यात वाईट स्थिती असताना हे फक्त दिल्लीची वारी करत आहेत. मी वयाचे भान ठेऊन बोलत आहे, मी अजून आक्रमण झालो नाही, मला आक्रमक व्हायला लागू नका.’’

- आदित्य ठाकरे, प्रमुख, युवासेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT