Pune-Municipal
Pune-Municipal 
पुणे

व्यावसायिक इमारतींनी पार्किंग शुल्क घेऊ नये

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी पुणेकरांची लूट थांबणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या विधी विभागानेदेखील महाराष्ट्र महापालिका अधिनियम तसेच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला देत व्यावसायिक ठिकाणी पार्किंग शुल्क आकारता येणार नाही, असा अभिप्राय दिला आहे. शॉपिंग मॉल तसेच मल्टिप्लेक्‍समधील पार्किंग शुल्क हा गेल्या अनेक वर्षांपासून शहरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतदेखील या विषयावरून चर्चा झाली. या सभेतही पार्किंग शुल्क आकारण्यास मनाई करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने यासंदर्भात महापालिकेच्या विधी विभागाकडून अभिप्राय मागितला होता. विधी विभागाने दिलेल्या अभिप्रायात महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 तसेच पुणे शहर विकास नियंत्रण नियमावलीचा आधार घेतला आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार अशाप्रकारे शुल्क घेता येणार नाही, असे म्हटले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार दिला आहे. हैदराबादमधील नागरिक मदनमोहन विरुद्ध हैदराबाद महापालिका यांच्यातील वादात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातही अशाप्रकारे शुल्क घेता येणार नाही, असे म्हटले आहे. यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांत या विषयात प्रथमच अशाप्रकारे स्पष्टता आली आहे. न्यायालयाच्या निकालाचा आधार थेट विधी विभागाने दिल्याने महापालिकेला याप्रकरणी आता कार्यवाही करणे भाग पडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT