Garbage Vehicle Sakal
पुणे

पुणे शहरात कचरा गाड्यांची कमतरता

शहर स्वच्छतेमध्ये देशात पुण्याचा पाचवा क्रमांक आला असला तरी कचरा उचलण्यासाठी गाड्या मिळत नसल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शहर स्वच्छतेमध्ये देशात पुण्याचा पाचवा क्रमांक आला असला तरी कचरा उचलण्यासाठी गाड्या मिळत नसल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

पुणे - शहर स्वच्छतेमध्ये (City Cleaning) देशात पुण्याचा (Pune) पाचवा क्रमांक आला असला तरी कचरा उचलण्यासाठी गाड्या मिळत नसल्याने शहरातील कचऱ्याचा (Garbage) प्रश्‍न गंभीर झाला आहे. शहरात सर्वकाही उत्तम असल्याचा दिखावा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्याची सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पोलखोल केली.

मोटार वाहन विभागातर्फे विविध कामांसाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेत आज ठेवण्यात आला. त्यावेळी नगरसेवकांनी कचऱ्याचा प्रश्‍न उपस्थित केला. शहरात कचरा उचलणाऱ्या गाड्या चार ते पाच महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे कचरा प्रश्न गंभीर झाला आहे. मोटार वाहन विभागातर्फे गाड्या भाडे तत्त्वावर घेणे सुटे भाग घेणे, आरटीओचे काम करून घेणे यासाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत ठेवण्यात आला होता. त्यावेळी नगरसेवकांनी या गाड्यांची नादुरूस्ती, अपुऱ्या गाड्यांविषयी चर्चा केली. नादुरुस्त गाड्यांचे स्पेअर पार्ट परदेशातून येतात का? असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केला.

याबाबत नगरसेविका प्रिया गदादे-पाटील म्हणाल्या, भाडे तत्त्वावर गाड्या घेतल्या जातात, पण सतत या गाड्या खराब होतात. दिलीप वेडे पाटील म्हणाले, आमच्या भागातील गाडी तीन महिने गॅरेजला आहे. स्पेअर पार्ट परदेशातून आणायचे आहेत का? समाविष्ट गावांमुळे प्रभाग मोठा झाला त्यामुळे तेथे कचरा संकलनासाठी गाडी आवश्यक आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी ३०० गाड्या कमी आहेत, गाड्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, असा खुलासा केला.

प्रवीण चोरबेले यांनी मोटार वाहन विभागालाच धारेवर धरले, ते म्हणाले, ‘‘मोटार वाहन विभागाचा डेपो माझ्या प्रभागात आहे. येथे भेट दिल्यानंतर तेथील भीषण परिस्थिती डोळ्यासमोर येईल. नवीन गाड्या खराब झाल्या आहेत, त्या दुरुस्त करणारे मेकॅनिक मिळत नाही म्हणून अनेक महिन्यांपासून गाड्या बंद पडलेल्या आहेत. मोटार वाहन विभागाला कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांबद्दल काही देणे घेणे नाही.’’

राडारोडा उचलणाऱ्या गाड्या अतिशय भंगार अवस्थेतील आहेत. फोन केले तरी गाड्या उपलब्ध नाही असे उत्तर दिले जाते. जेटींग मशिनला मागणी आहे. त्यामुळे डिझेल जास्त लागत असल्याचे योगेश ससाणे यांनी सांगितले.

तर महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील ग्रामपंचायतीच्या खराब झालेल्या कचऱ्याच्या गाड्या पालिका दुरूस्त तर करत नाही. त्यात नव्या गाड्या देण्याचे लांबच आहे. मोटार विभागही व्यवस्थित काम करत नसल्याची टीका गणेश ढोरे यांनी केली.

तीनशे गाड्यांची गरज आहे, याची निविदा ७ वर्षासाठी काढली जाणार आहे. अतिरिक्त गाड्या सध्याच्या ठेकेदाराकडून मागवून घेऊ. नवीन गावात देखील गाड्या पुरविल्या जातील.

- विक्रम कुमार, आयुक्त महापालिका

२१०० ते २२०० टन रोज निर्माण होणारा कचरा

  • ७०० ते ८०० टन ओला कचरा

  • १३०० ते १४०० टन सुका कचरा

  • ६८३ कचरा वाहतूक करणारी वाहने

  • ३०० कमी पडणारी वाहने

  • सुमारे १० हजार सफाई कर्मचारी

महापालिकेकडे कचऱ्यासाठी ६८३ गाड्या आहेत. यातील १६० गाड्या १५ वर्षे जुन्या आणि ९० गाड्या या १० ते १५ वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे मेन्टेनन्स जास्त आहे. २३ गावांच्या समावेशानंतर २७० गाड्यांची कमतरता असून, १५व्या वित्त आयोगातून ५६ गाड्या घेत आहोत. उर्वरित गाड्या ठेकेदाराकडून घेतल्या जातील.

- महेश डोईफोडे, उपायुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT