Prashant Kate
Prashant Kate Sakal
पुणे

छत्रपती कारखान्याने २५ कोटी ४० लाख रुपये सभासदांच्या खात्यावर केले जमा

राजकुमार थोरात

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १ मार्च २५ मार्च दरम्यान गाळप झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे २५ कोटी ४० लाख रुपयांचे पेमेंट आज मंगळवार (ता. २९) रोजी सभासदांच्‍या खात्यावर जमा.

वालचंदनगर - सभासदांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळण्यासाठी भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर (Shri Chhatrapati Sugar Factory) कारखान्याने १ मार्च २५ मार्च दरम्यान गाळप झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या (Farmer) उसाचे २५ कोटी ४० लाख रुपयांचे पेमेंट (Payment) आज मंगळवार (ता. २९) रोजी सभासदांच्‍या खात्यावर (Account) जमा केल्याची माहिती छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल काटे यांनी दिली.

चालू वर्षाची आर्थिक वर्षाअखेर ३१ मार्च रोजी आहे. ३१ मार्च पर्यंत बॅंका,विविध कार्यकारी सेवा संस्था यांचे पीककर्ज न भरल्यास शेतकऱ्यांना शून्य व्याजचा फायदा मिळणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १ ते २५ मार्च पर्यंत गाळप केलेल्या उसाचे प्रतिटन २२०० रुपये प्रमाणे सर्व पेमेंट सभासदांच्या खात्यावर जमा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. यामुळे सभासदांना सहकारी सोसायट्यांकडून घेतलेल्या पीक कर्जाचे नवे-जुने करता येणार असून सभासदांचा फायदा होणार आहे. काटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पीक कर्जाचे ३१ मार्च पूर्वी बॅक खात्यामध्ये पैसे भरता येण्यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे.

सध्या कारखान्याचा गळीत हंगाम वेगाने सुरु असून आजपर्यंत ११ लाख ८९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी ११.०४ टक्के असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून ५ कोटी ३७ लाख ३० हजार ८०० युनिटस् वीज निर्मिती झाली असून यापैकी ३ कोटी ४९ लाच ४७ हजार युनिटस् वीज निर्यात करणेत आली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १ लाख २५ हजार मेट्रीक टन ऊस शिल्लक असून सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करणेत येणार असून सभासदांनी ऊस गाळपाची चिंता करू नये असे आवाहन काटे व पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT