पुणे

Loksabha 2019 :  भाजपच्या साथीसाठी बारणे मुंबईत 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार व ‘युती धर्म’ यापासून शहर भारतीय जनता पक्ष अद्याप अलिप्त आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघे २८ दिवस बाकी असल्याने बारणे यांना भाजपची सक्रिय साथ हवी आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्यासाठी नियोजित प्रचार दौरे रद्द करून त्यांनी सोमवारी (ता. १) मुंबई गाठली. 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. जागावाटपात मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे खासदारकीसाठी इच्छुक असलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या इच्छेवर पाणी फिरले. उलट राजकारणात कट्टर विरोधक व शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र, जगताप यांनी अद्याप ‘आपले पत्ते’ खुले केलेले नाहीत. प्रचारात सक्रिय होण्याबाबत खुद्द बारणे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली. शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि खासदार संजय राऊत यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे चर्चा करून जगताप यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तरीही ते व भाजप कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले नाहीत. मात्र, पक्ष कार्यालयात प्रचार साहित्य दाखल झाले आहे. त्यात पक्षाचे झेंडे, बिल्ले, फलक यांचा समावेश आहे. मग, अडले कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या दोघांत समेट घडवून आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व नीलम गोऱ्हे यांच्यात आठवड्यात पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT