siddheshwar nimbodi farmer water issue
siddheshwar nimbodi farmer water issue 
पुणे

अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे सिध्देश्वर निंबोडीचे शेतकरी पाण्यापासुन वंचित

संतोष आटोळे

शिर्सुफळ : सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथील शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत पैसे गोळा करुन मशिनच्या सहाय्याने तसेच स्वत: पोटचाऱ्यामधील गाळ काढुन पारवडी येथुन खडकवासला कालव्यातुन सिध्देश्वर निंबोडी, मदनवाडीकडे जाणाऱ्या 36 क्रमांकाच्या दुरावस्था झालेल्या पोटचारीची तात्पुरती दुरुस्ती केली पोटचारीला पाणीही सोडण्यात आले मात्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे शेवटच्या व पहिल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यात आले. मात्र मधील भागातील शेतकऱ्यांनी पाणी मिळाले नाही.

यामुळे पाण्यावर योग्य देखरेख न ठेवल्याने तसेच ठराविक शेतकऱ्यांसाठीच पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न केल्याने इतर शेतकऱ्यांपर्यत पाणीच पोहचले नाही याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर पाटकरी यांनी पोटचारीवर स्वता उपस्थित राहत आज (ता.15) रोजी पुन्हा उर्वरित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.या सगळ्या प्रकरणात मात्र अधिकारीच शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावत असल्याचे प्रकर्षाने जाणवले यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.   

पारवडी येथुन खडकवासला प्रकल्प नवीन मुठा उजवा कालवा वितरिका क्र.36 पोटचारीतुन पाणी सोडण्यात आले. परंतू पाणी शेतीत पोहचण्यापूर्वीच अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने तसेच पाटबंधारे विभागाचे कर्मचारीच उपस्थित नसल्याने योग्य नियोजन न करता प्रथम टेलला पाणी दिलेल्यावर पोटचारीच्या हेडला पाणी सोडण्यात आले. मधले शेतकरी मात्र पाण्यापासुन वंचित राहिले.याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी आज रविवार सकाळी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यावर पाटकरी हजर झाले त्यांनी मोठ्या थाटात शेतकऱ्यांमध्येच कशा पध्दतीने वाद लागतील अशी कार्यपध्दती राबवली व आमच्याकडे कर्मचारीच नाहीत आम्ही तरी काय करु असा प्रश्न उपस्थित केला.यावर शेतकऱ्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रानुरुप आजच दुपारपर्यत पुन्हा पाणी येईल तुमच्या भिजवण्याची जबाबदारी मी घेतो असे म्हणत वेळ मारुन नेली.  
      यामुळे सिध्देश्वर निंबोडीचे माजी सरपंच किशोर फडतरे, धनंजय धुमाळ, शंकर कन्हेरकर, बापुराव धुमाळ, संतोष नगरे, संपत सवाणे, रमेश कन्हेरकर, अंतोष धुमाळ, पोपट खडके, गणेश कन्हेरकर यांच्यासह ग्रामस्थांनी आगामी काळामध्ये असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

पैसे दिले तरच पाणी मिळते ?
याप्रश्नाबाबत संबंधित भागातील शेतकऱ्यांनी पाटकऱ्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जे शेतकरी पैसे देतात त्यांनाच पाणी दिले जाते तर आम्ही रितसर परवाना फाडण्यास तयार असतानाही आम्हाला पाण्यापासुन वंचित ठेवले जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी दादांना भेटणार आहे असे म्हटल्यावर दादा दार धरायला बोलवा असे सांगितले असा आरोप शंकर कन्हेरकर व रमेश कन्हेरकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT