Signals of molecular hydrogen captured by GMRT pune sakal
पुणे

Pune News : जीएमआरटीने टिपले आण्विक हायड्रोजनचे संकेत

कॅनडाच्या शास्त्रज्ञांचाही सहभाग; आजवरची सर्वाधिक ताम्रसृतीची (रेडशीफ्ट) नोंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खोडद येथील जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपला (जीएमआरटी)पृथ्वीपासून सुमारे ८८ लाख प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या दीर्घिकेतील आण्विक हायड्रोजनचे संकेत टिपण्यात यश आले आहे.

कॅनडास्थित मॅकगिल विद्यापीठ आणि बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेतील (आयआयएससी) शास्रज्ञांनी आत्तापर्यंतचा सर्वाधिक ताम्रसृतीची (रेडशीफ्ट) नोंद घेतली आहे. या संबंधीचे संशोधन नुकतेच ब्रिटनमधील रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनाची पार्श्वभूमी

दीर्घिकांमघील तारे हायड्रोजन मुलकणांच्या महाप्रचंड ढगांमधून निर्माण होतात. गुरुत्वीय बलामुळे हे मूलकण परस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढत, ते स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरुवात होते.

गाभ्याकडे ढासळणाऱ्या अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. ज्यामुळे गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. हीच ताऱ्याची प्राथमिक अवस्था समजली जाते.

प्राथमिक अवस्थेतील ताऱ्याचे तापमान काही कोटी सेंटिग्रेड झाल्यानंतर हायड्रोजनचे ज्वलन सुरू होते. यातून वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होऊन ती ऊर्जा प्रकाश आणि उष्णता इत्यादी स्वरूपात उत्सर्जित होत राहते. यालाच तारा निर्माण झाला, असे म्हणतात. हायड्रोजन ढगांची विविध स्थित्यंतरे, तारे निर्मितीच्या विविध अवस्था यांचे निरीक्षण केल्यास आकाशगंगांची उत्क्रांती समजते.

संशोधनाची वैशिष्ट्ये

निरीक्षणांसंदर्भात गुरुत्वीय भिंग नामक निरीक्षण संकल्पना वापरण्यात आली होती. ज्यामुळे सुदूर अंतरावरून येणाऱ्या पण मार्गातील अन्य महाकाय खगोलीय घटकांमुळे वक्र झालेल्या रेडिओ प्रारणाचीही अचूक निरीक्षणे साध्य होतात.

मॅकगिल विद्यापीठातील शास्त्रज्ञ अर्णब चक्रवर्ती आणि आयआयएससीचे प्राध्यापक निरुपम राय यांनी ‘‘ताम्रसृतीच्या या निरीक्षणांमुळे भविष्यात हायड्रोजन ढगांची विविध स्थित्यंतरे समजण्यास मोठीच दिशा मिळेल’’, असे सांगितले. तर जीएमआरटीचे संचालक प्रमुख डॉ. यशवंत गुप्ता यांनी, ‘‘आकाशगंगादरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा शोध घेणे हा जीएमआरटीचा एक मुख्य उद्देश आहे.’’

काय आहे संशोधन..

  • आण्विक हायड्रोजनमधून उत्सर्जित होणाऱ्या २१ सेंटिमीटर तरंगलांबीवरील रेडिओ प्रारणाचे विविध प्रकारे निरीक्षण केले जाते.

  • संबंधित संशोधनातून डॉप्लर परिणामामुळे आजपर्यंत मोजण्यात आलेली ताम्रसृती (रेड शिफ्ट) सर्वात जास्त म्हणजे १.२९ आढळली आहे.

  • आजपर्यंत मोजलेली ताम्रसृती ०. ३७६ एवढी होती.

  • या संशोधनातील ताम्रसृतीच्या मोजमापावरून संबंधित आकाशगंगेचे पृथ्वीपासून असलेले अंतर ८८ लाख प्रकाश वर्षे असल्याचे सिद्ध होते

  • तसेच ही आकाशगंगा दीर्घ वर्तुळाकार असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या निरीक्षणांमधून या आकाशगंगेतील हायड्रोजनचे अस्तित्वही दुप्पट प्रमाणात असल्याचे आढळून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT