Nilesh Fatak
Nilesh Fatak Sakal
पुणे

दीड वर्षात तब्बल ३८० वेळा सिंहगड सर करणारा अवलिया

अक्षता पवार

गड किल्ल्यांचे आकर्षण, गिर्यारोहणाची आवड आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी गेल्या दीड वर्षात तब्बल ३८० वेळा सिंहगडाचा सर करणाऱ्या अवलियाला सिंहगड भूषण मानचिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

पुणे - गड किल्ल्यांचे आकर्षण, गिर्यारोहणाची (Trekking) आवड आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी (Health) गेल्या दीड वर्षात तब्बल ३८० वेळा सिंहगडाचा (Sinhgad Fort) सर करणाऱ्या अवलियाला सिंहगड भूषण मानचिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले. नीलेश नरहर फाटक, (Nilesh Fatak) असे या ३८ वर्षीय अवलियाचे नाव आहे. सिंहगड परिवार समितीच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

नीलेश हे नारायण पेठेतील रहिवासी असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. कोरोना काळात आरोग्याची काळजी आणि गिर्यारोहणाचा छंद जोपासत त्यांनी मार्च २०२० दररोज सिंहगडाचा सर करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केवल सिंहगडच नाही तर नीलेश यांनी तुंग, तिकोना, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, राजगड, रायगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, केंजळगड, सुधागड, मल्हारगड, रोहिडा, रायरेश्वर, हरिश्चंद्रगड आदी गड किल्ल्यांवर ही गिर्यारोहणाच्या मोहिमा फत्ते केल्या आहेत.

याबाबत नीलेश यांनी सांगितले की, ‘‘लहानपणापासूनच सिंहगड आणि पुण्याच्या आजूबाजूचे गडकिल्ल्यांबद्दल नेहमीच आकर्षण होते. त्यामुळे गिर्यारोहणाची आवड ही निर्माण होत गेली. मात्र नोकरी करत असताना स्वतःची काळजी घेणे आणि गिर्यारोहणाचा छंद जोपासणे मागे पडले. अधूनमधून गिर्यारोहण होत होते, पण गिर्यारोहणाचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो हे कालांतराने समजत गेले. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे घरातच राहून कंटाळा येत होता. गड किल्ले हे प्राकृतिक संसाधन असून जिममध्ये जाऊन आरोग्याची काळजी घेण्याऐवजी गड किल्ले सर करण्यास सुरवात केली. सुरवातीला ‘सिंहगड वारी जगात भारी’ असा नारा देत आठवड्यातून किमान एकदा गिर्यारोहण करत होतो. त्यानंतर दररोज सिंहगड वारी सुरू झाली. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे २०२१ मध्ये इतर गड किल्ल्येही सर केले. तर २०२१ च्या अखेरीस सिंहगड वारी ३८० पर्यंत येऊन ठेपली याचा आनंद आहे. पुढे ही हा प्रवास असाच राहणार आहे.’’

सिंहगड वारीमुळे शारीरिक क्षमतांची जाणीव :

सिंहगडावर गेल्यावर अनेक अवलियांना भेटलो आणि त्यांची इच्छाशक्ती व शारीरिक क्षमता बघून आपली कुवत कळाली. सिंहगडावर गिर्यारोहण करणाऱ्या ७० ओलांडलेले जुगल किशोर नावाच्या व्यक्तीला पाहून मला अधिक प्रेरणा मिळाली आणि दररोजची सिंहगड वारीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर १७५ सिंहगड वारींचा टप्पा पार केला. हे करत असताना मी तब्बल १५ किलो वजन ही कमी केले आणि त्याचबरोबर जी सिंहगड वारी पूर्वी एक तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण होत होती, त्याला आता ३८-४० मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची क्षमता निर्माण झाली. रोज सकाळी ४ वाजता उठून सिंहगड वारी करून सकाळी साडेआठ वाजता घरी परतायचे हे एक नित्यानियमाचे झाले. त्यामुळे काम आणि गिर्यारोहण या दोन्हीचा तालमेल ही बसविण्यात यश आले. गिर्यारोहणामुळे शारीरिक क्षमता वाढलीच पण मानसिक स्थैर्य पण आले जे जास्त महत्त्वाचे आहे, असे नीलेश यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT