पुणे

पुणे - नाशिक रस्त्यावर सहा तास वाहनकोंडी

डी. के. वळसे पाटील

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. 11) दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. जीवन रेस्टोरंट, महात्मा गांधी विद्यालय ते गेटवेल हॉस्पिटल हे सव्वा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना तब्बल अर्धा ते पाऊण तास कालावधी लागत होता. अतिशय मंद गतीने सुरू असलेली वाहतूकही वारंवार खंडित होत होती. प्रवासात असलेल्या महिला, वृद्ध व लहान मुलांचे यामुळे अतोनात हाल झाले.

दिवाळीची सुट्टी संपल्याने रस्त्यावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. यंत्रसामग्री वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची भर पडल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली. मंचरचा आठवडे बाजार रविवारी भरतो. त्यातच दिवाळी सणाची गर्दी. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत मंद गतीने सुरू असलेली वाहतूकही पिंपळगाव फाटा, शिवगिरी मंगल कार्यालय, बसस्थानक व मुळेवाडी चौकात खंडित होत होती. भीमाशंकर कडे ये- जा करण्यासाठी अनेक वाहनचालकांनी उजव्या कालव्याच्या मार्गाने प्रवास केला. पण त्याही भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ये जा करणाऱ्या 50 हून अधिक एसटी गाड्या, एशियाड व खाजगी बसमधील प्रवाशांना प्रवास कंटाळवाणा झाला. मंचर पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. पण रस्त्यावर वाहनांची प्रचंड संख्या होती. त्यामुळे पोलीसही हतबल झाले होते. दरम्यान अवजड वाहनांना दिवसा ऐवजी रात्री परवानगी दिल्यास वाहन कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. असे अनेक प्रवाशांनी सांगितले.

बाह्य वळणाची कामे रेंगाळली    
दरम्यान नियोजित खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्यासाठी कळंब, एकलहरे, मंचर, निघोटवाडी, शेवाळवाडी व तांबडेमळा या भागातील बाह्यवळणाची कामे ठेकेदार पळून गेल्याने दीड वर्षापासून बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी दुसऱ्या एका ठेकेदाराने बाह्यवळण रस्त्याच्या कामाची तयारी केली होती. पण संबंधित ठेकेदार व यंत्रसामग्री ही गायब झाली आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याचे काम रेंगाळले आहे. वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे. या मागणीसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ लवकरच भेटणार आहे. असे आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT