skill development Summer classes at university Science Park education student
skill development Summer classes at university Science Park education student  sakal
पुणे

Pune : विद्यापीठातील सायन्स पार्कमध्ये उन्हाळी वर्ग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोणाला बागकामाची आवड असते तर कोणाला ग्रह ताऱ्यांचं कुतूहल असतं, कोणाला गणित आवडतं तर कोणी विज्ञानातले प्रयोग करण्यास इच्छुक असतं अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची आवड आणि शिक्षण याची सांगड घालत नवे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकशन' म्हणजेच सायन्स पार्क तर्फे मे महिन्यात समर कॅम्प २०२३ चे आयोजन केले आहे.

बच्चे कंपनीची शाळेची सुटी सुरू झाली आहे. ही सुटी मजेत तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात घालवण्यासाठी उत्तम पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे. इयत्ता दुसरी पासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती सायन्स पार्कचे समन्वयक डॉ.रा.ल.देवपूरकर यांनी दिली.

२ मे ते २४ मे या कालावधीत एक दिवसीय कॅम्प होत आहे तर दोन दिवसीय कॅम्प ८ ते २३ मे या कालावधीत होणार आहे. यासाठीची सर्व माहिती कॅम्पच्या तारखा तसेच यासाठीचे शुल्क विद्यापीठाच्या sciencepark.unipune.ac.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

या कॅम्प मध्ये विद्यापीठ परिसरात निसर्ग भ्रमंती, विज्ञान खेळ, रसायनशास्त्र, बागकाम, खगोलशास्त्र, गणित आणि जैवशस्त्र, विज्ञान खेळणी, तज्ज्ञांशी चर्चा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संकेतस्थळावर जात यासाठी नोंदणी करावी ही विनंती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT