Slotted antennas
Slotted antennas 
पुणे

लष्करी जवानांच्या सुरक्षिततेसाठी 'स्लॉटेड अँटेना' 

सकाळवृत्तसेवा

पुणे - युद्धादरम्यान लष्करी जवानांवर चारही दिशेनी हल्ला झाल्यास त्यांच्या जीवाचा धोका निर्माण होतो. त्यांच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून युद्धभूमीवर कोणत्याही दिशेने येणाऱ्या लक्ष्यला शोधून काढण्यासाठी 'स्लॉटेड अँटेना' या यंत्रणेची रचना करण्यात आली आहे. सध्या वापरण्यात येत असलेल्या 'अँटेना' प्रणालीच्या तुलनेत हे 'स्लॉटेड अँटेना' आकाराने तसेच वजनाने हलके असून हाताळण्यास सोपे आहे. 

या आधुनिक अँटेनाचे तंत्रज्ञान दिल्ली येथील 'जयपी  संस्थे'च्या (जेआयआयटी) माहिती व तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापकांनी विकसित केले आहे. यामध्ये प्रा. मनोज गर्ग व डॉ. जासमीन सैनी यांचा सहभाग आहे. या तंत्रज्ञानाच्या अभ्यासाबाबतची माहिती नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) 'डिफेन्स सायन्स जर्नल'मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार हे 'स्लॉटेड अँटेना' इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित केले जाते. तसेच या अँटेनाला सहा भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. यातून निघणाऱ्या 'रेडिएशन'च्या (विकिरण) आधारावर कमी पल्ल्याच्या अंतरावरून स्थिर (स्टेशनरी) किंवा अस्थिर (नॉनस्टेशनरी) लक्ष्य शोधले जाते. त्यामुळे जवानांना या संकटावर योग्य वेळेत हल्ला करणे सोपे होते.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर लष्करी क्षेत्रात सातत्याने अत्याधुनिक शस्त्र प्रणाली व यंत्रणांची निर्मिती होत आहे. त्यामुळे लष्कराच्या तिन्ही दलांचे आधुनिक दलांमध्ये परिवर्तन होत आहे. आगामी काळात अश्या प्रकारचे अत्याधुनिक अँटेना विकसित करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असल्याचे डॉ. सैनी यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"सध्या लष्कराकडे असलेल्या अँटेना एकाच ठिकाणी स्थापित करण्यात आले असून त्याचे वजन जास्त असल्याने सातत्याने या अँटेनाला हलवणे शक्य नाही. तसेच ते केवळ अस्थिर किंवा फिरत असलेल्या लक्ष्य शोधण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे स्थिर असलेले सेन्सर, रडार, जमिनीत ठेवण्यात आलेले विस्फोटक अश्या गोष्टींना पटकन ओळखणे या पारंपरिक अँटेना प्रणालीद्वारे शक्य नसल्याने तसेच या समस्येवर मात करण्यासाठी या अँटेनाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या याची प्रयोगशाळेतील यशस्वी चाचणी झाली असून लवकरच डीआरडीओतर्फे याची चाचणी केली जाणार आहे. "
- प्रा. मनोज गर्ग, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'स्लॉटेड अँटेना'चे वैशिष्ट्य व त्याचा उपयोग:
- याचा उपयोग लष्करासाठी 'शॉर्ट-रेंज रडार' म्हणून जमिनीवरील किंवा आकाशातील पाळत ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो
- रणांगणात पाहणी करण्यासाठी व क्षेपणास्त्र शोधून त्यांच्यावर त्वरित कारवाई करणे शक्य
- आधुनिक वायरलेस कम्युनिकेशन सिस्टममधील इतर अनुप्रयोगात याचा वापर
- स्लॉटेड अँटेनाची लांबी, रुंदी आणि स्थिती बदलून रेडिएशन पॅटर्नची दिशा नियंत्रित केली जाऊ शकते
- हे लहान आणि कमी वजनाचे असल्याने सैनिक स्वतंत्रपणे व याचा वापर कुठेही करू शकतील
- हे हाताळणे सोपे असल्याने जवळील कोणतेही लक्ष्य शोधू ते वेळेत नष्ट करणे शक्य
- सीमेवरील जवानांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT