पुणे

ढाकाळे येथे चोरट्यांचा धुमाकुळ

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : ढाकळे (ता. बारामती) भागात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू आहे. चोरट्यांनी रात्रीत चार ठिकाणी घरफोडी केली. दोन ठिकाणचा 1 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यामधे मंदीरातील दानपेटी गेल्याने ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. तर दोन घरात काहीच मिळुन आले नाही. शनिवार (ता. १४) रात्री हा प्रकार घडला.

गणेश सुभाष जगताप रा. ढाकाळे यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गणेश आपल्या गावातील घराला कुलुप लाउन शेतातील गोठ्यात झोपायला गेले असता. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करत लाकडी कपाटातील सोन्याचे दागीने काढले. यानंतर दुसरी घरफोडी राहुल प्रताप जगताप यांच्या घरात केली. घरातील सदस्य मुंबईला असतात कोणीही नसल्याने कुलुप तोडुन चोरटे आत घुसले सर्व ठिकाणी शोधुन चोरट्यांना ऐवज मिळाला नाही.

घरातील साहीत्य आस्तवेस्त टाकुन पुन्हा दार लावत चोरटे निघुन गेले. तीसरी घरफोडी संदिप बाळासाहेब थोरात यांच्या घरात केली. घरातील लोक पालखीला गेल्यामुळे घराला कुलुप होते. चोरट्यांनी घरात प्रवेश केला कपाटासह सर्व ठिकाणी ऐवज शोधला पण हाती काहीच लागले नाही. जोगेश्र्वरी मंदीरातील दानपेटी मात्र चोरट्यांनी पळवुन नेली आहे. देवाचे सोन्याचे दागीनेही पळवुन नेले आहेत. रात्रीत चार ठिकाणी केलेल्या चोरी दरम्यान कोठेही आवाज झाला नसल्याने ग्रामस्थांना जाग आली नाही.

सकाळी मंदीरातील चोरी उघडकीस आल्यावर चोरीच्या ऐकेक घटनेची माहीती ग्रामस्थांना मिळाली. पोलीसांकडे माहीती येताच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास बडवे, उपनिरिक्षक गोरख संकपाळ पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड यांनी घटना स्थळावर जाउन पहाणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT