3.jpg
3.jpg 
पुणे

आयएनएस शिवाजीमध्ये जवानाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : लोणावळ्यातील नौदल प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीमध्ये एका प्रशिक्षणार्थी जवानाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी (ता. 5) पहाटे उघडकीस आला. 

आकाश साईनाथ कन्नाला (वय 20, सध्या रा. गंगा ब्लॉक, आयएनएस शिवाजी, कुरवंडे, लोणावळा. मूळ रा. पार्डी, निरमल, तेलंगणा) असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी जवानाचे नाव आहे.या बाबत मुकेशकुमार राजेंद्र चौधरी (वय 28) यांनी पोलिसांत माहिती दिली.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ड्युटीवर असलेले गार्ड योगेंद्र मोतीराम सिंह हे गंगा ब्लॉक परिसराची पाहणी करण्यासाठी गेले असताना वाटेत त्यांना एक कर्मचारी दिसला. योगेंद्र याने आकाश कोठे आहे, अशी विचारणा केली. तो बाथरुमला गेला असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही आकाश बाहेर न आल्याने योंगेद्र सिंह व या कर्मचाऱ्याने आकाशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गंगा ब्लॉकनजीकच्या मनोरंजन सभागृहातील खोली बंद दिसली. त्यावेळी खिडकीतून पाहिले असता आकाशने पांढऱ्या बेडशीटने फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. तसेच आकाशला आयएनएस शिवाजी येथील कस्तुरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. आकाशच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. लोणावळा शहर पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT