Someshwarnagar Pune
Someshwarnagar Pune 
पुणे

क्षण सुखाचा आला; जटांचा भार उतरला!

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर - "पंधरा वर्स झाली एकाच कुशीवर झोपतीय... देवरूषाच्या सांगण्यावरनं केसाला फणी लावली नाय का धुतलं नाय... मान दुखायची... लय तरास व्हायचा पण देवरूषी देवाचं भ्या घालायचा... दाभोळकरांची लोकं जटा कापत्यात हे पेपरातून कळालं मनाचा धडा केला आणि त्यानाल बोलवून जटा कापल्या... मोठ्ठं वझं उतारलं, लय मोकळं मोकळं वाटतंय!"

मगरवाडीनजीक नाईकवाडी (ता. बारामती) येथील शांताबाई शिवाजी ढम शिरावरले अनेक वर्षांचे ओझे उतरल्याच्या आनंदात दैनिक सकाळशी बोलत होत्या. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी गावातील महिलांच्या साक्षीने आजच ही मोलाची कामगिरी बजावली. याप्रसंगी सरपंच अजित सोरटे, अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण भापकर, जिल्हा सचिव भारत विठ्ठलदास, माजी जिल्हा सचिव रघुवीर तुपे आदी उपस्थित होते. 

शांताबाईंच्या केसांमध्ये साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी गुंता होऊन बटा निर्माण झाल्याचे आढळले. यल्लमाआईच्या देवरूषाने त्या बटा देवीच्या असल्याचे सांगत वेणी-फणी करू नका अशा सूचना दिल्या. अमावस्या पोर्णिमा कार्यक्रम सुरू झाले. देवपण आल्याने काही बायका जटांना हळदकुंकू वाहू लागल्या. ढोल वाजला की अंगात यायला लागलं. तुळजापूर आणि काळूबाईच्या फेऱ्या वाढल्या. या सगळ्यात जटांचा गुंता आणि भरडपणा आणखीनच वाढला. जटांच्या ओझ्याने मान दुखू लागली. फक्त डाव्या कुशीवर झोपता यायचं. पाठीवर किंवा उजव्या कुशीवर वळायची सोय नाही.

बाहेरगावी जटा झाकून फिरावं लागायचं. पण 'देवाचं हाय' म्हणून त्या सहन करत राहिल्या. अनिसचे रघुवीर तुपे दोन वर्ष त्यांना जटा कापा. देव चांगला असतो तो कोपत नाही अशी समजूत घालत होते. परंतु शांताबाईंचे धाडस होत नव्हते. नुकतीच तमाशा कलाकार मालती इनामदार यांच्या जटा नंदिनी जाधव यांनी कापल्या असल्याची माहिती शांताबाईंनी पेपरमधे वाचली. जटा असणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून जटा कापण्यासाठी नंदिनी जाधव यांनी आपला मोबाईल क्रमांकही सर्वत्र फिरविला होता. त्या क्रमांकावर शांताबाईंनी संपर्क साधला. जाधव यांनी शांताबाईंच्या शेजारच्या मुलाच्या व्हॅाटसअपवर काही माहिती व व्हिडीओ टाकले. ते पाहून शांताबाईंची इच्छाशक्ती बळावली. आज जाधव त्यांच्या घरी आल्या आणि त्यांच्या कुटुंबाशी व आजूबाजूच्या महिलांशी बोलून 'श्रध्दा आणि अंधश्रध्दा' यातील फरक समजावला. 'देवाची भक्ती जरूर करत रहा पण देव माझ्यासाठी त्रास घ्या असे सांगत नाही' हे पटवून दिले. सर्वच महिला जटा कापण्याशी सहमत झाल्या. घरातील पुरूष मंडळींचीही सहमती होती. अखेर पंधरा वर्षांनी जाधव यांची कात्री जटांवरून फिरली आणि शांताबाईंच्या चेहऱ्यावर सुखद हास्याची लकेर उमटली.

नंदिनी जाधव चार वर्ष जटानिर्मूलनाचे काम करत आहेत. ब्युटी पार्लरचा मोठा व्यवसाय सोडून त्या अनिसच्या कामात आहेत. अंध समजुतींमुळे जटांमध्ये अडकलेल्या महिलांना मोकळ्या करत आहेत. 'सर्व जातींच्या महिलांमध्ये जटा होत्या. देवरूषी स्वतःच्या फायद्यासाठी देवीची भिती घालतात. अनारोग्य, मानसिक ताण याने महिला त्रस्त असतात. आजपर्यंत 71 महिलांच्या जटा काढल्या' असे जाधव यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT