सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - अवकाश विज्ञान परिषदेचे मंगळवारी उद्‌घाटन करताना डॉ. के. सिवन. या वेळी (डावीकडून) के. कस्तुरीरंगन, डॉ. जॉर्ज जोसेफ, डॉ. यशवंत गुप्ता, डॉ. सौमेक रायचौधरी आणि  डॉ. नितीन करमळकर.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - अवकाश विज्ञान परिषदेचे मंगळवारी उद्‌घाटन करताना डॉ. के. सिवन. या वेळी (डावीकडून) के. कस्तुरीरंगन, डॉ. जॉर्ज जोसेफ, डॉ. यशवंत गुप्ता, डॉ. सौमेक रायचौधरी आणि डॉ. नितीन करमळकर. 
पुणे

आगामी सहा वर्षे अवकाश मोहिमांची - डॉ. सिवन

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘देशातील अवकाश मोहिमांच्या दृष्टीने पुढील सहा वर्षे महत्त्वाची असणार आहेत. याची सुरवात या एप्रिलपासून होईल. या एप्रिलमध्ये ‘चांद्रयान २’ हे अवकाश यान सोडले जाणार असून, ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. त्याशिवाय सूर्यवलयाचा अभ्यास करणारे ‘आदित्य मिशन’, मंगळयान-२, शुक्र ग्रहाबाबत २०२३ मध्ये ‘व्हीनस मिशन’, ‘चंद्रावरील पाण्याचा शोध घेणारी मोहीम’ सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणाचा (मायक्रोग्रॅव्हिटी एटमॉस्फियर) संशोधन करणारे ‘गगनयान’, एटमॉस्फेरित सायन्सेसच्या (वातावरणीय शास्त्र) अनुषंगाने ‘दिशा१’ व ‘दिशा२’ असे विविध कार्यक्रम नियोजनात आहेत,’’ अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी मंगळवारी येथे दिली.

‘अवकाश विज्ञान’ (स्पेस सायन्सेस) या विषयातील ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. सिवन बोलत होते.

या वेळी ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन, वैज्ञानिक सल्लागार डॉ. जॉर्ज जोसेफ, उपग्रह कार्यक्रमाचे संचालक डॉ. शिवकुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्‍स (आयुका) या संस्थेचे संचालक डॉ. सौमेक रॉयचौधरी, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स (एन.सी.आर.ए.) या संस्थेचे संचालक डॉ. यशवंत गुप्ता, स्थानिक समन्वयक डॉ. पी. प्रदीप कुमार हे उपस्थित होते. ही परिषद ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

डॉ. सिवन म्हणाले, ‘‘या निर्माण झालेल्या संधींचा देशातील वैज्ञानिक घटकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. अवकाश संशोधनाच्या विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन भविष्यात लागणारे वैज्ञानिक मनुष्यबळही निर्माण केले पाहिजे.’’

इस्रोने नुकताच ‘संवाद वुईथ स्टुडंट्‌स’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे देशाच्या सर्व विभागांमध्ये सहा स्पेस टेक्‍नॉलॉजी इन्क्‍युबेशन सेंटर व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहेत. त्याद्वारे अवकाश विज्ञानात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळ व मार्गदर्शन दिले जाईल. याद्वारे देशात लपलेली तरुणांची बुद्धिमत्ता शोधण्यास मदत होईल, असे डॉ. सिवम यांनी सांगितले.

डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले, ‘‘अवकाश संशोधनात देश प्रगती करत आहे. विविध महत्त्वाची मिशन हाती घेण्यात आली आहेत आणि ती कमी वेळात पूर्ण करण्याचे आव्हान आहे. पायाभूत सुविधा अिाण तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत प्रगती करत आहे. मात्र, भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आता सर्वाधिक गरज आहे ती तातडीच्या सक्षम मनुष्यबळाची. त्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये भरीव कार्य करण्याची आवश्‍यकता आहे.’’

डॉ. करमळकर यांनी स्वागत केले. डॉ. पी. प्रदीप कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT