विश्रांतवाडी ते 509 चौक या रस्त्याचे काम गेले दीड वर्षे चालू आहे. खूप हळूहळू काम चालू असल्याने नागरिकांची फार गैरसोय होत आहे.
विश्रांतवाडी : टिंगरेनगर (Tingrenagar Vishrantwadi) येथे चारचाकीला वाचविण्यासाठी बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस (Bus) रस्त्यावरून खाली उतरून अपघात टळला. येथील शांती होंडासमोर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास झालेल्या या अपघातात समोर असणारी चारचाकी अचानक थांबल्याने बसचालकाने प्रसंगावधान राखून बस वळवली. त्यामुळे बस रस्त्यावरून खाली उतरली.
या ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण चालू असल्याने दुसर्या बाजूला खोदकाम केलेले आहे. त्यामुळे तो भाग बराच खाली आहे. या ठिकाणी बसला जोरात झटका बसल्याने काही प्रवाशांना (Passengers) हादरे बसले. पण, चारचाकीला धडक बसली नसल्याने खूप मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये 35 ते 40 प्रवासी होते. ही निगडी ते हडपसर ही 149 क्रमांकाची पीएमपीएलची बस निगडीकडे निघाली होती. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला.
याबद्दल प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. तेथून जवळच कार्यरत असलेल्या जेसीबीने ही बस खड्ड्यातून उचलून पुन्हा नीट सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले. पण, यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली. तसेच रस्त्यावर आडव्या झालेल्या बसमुळे मागील वाहनांना अडथळा झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
विश्रांतवाडी ते 509 चौक या रस्त्याचे काम गेले दीड वर्षे चालू आहे. खूप हळूहळू काम चालू असल्याने नागरिकांची फार गैरसोय होत आहे. या ठिकाणी ठेकेदाराने वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अनेकदा, विशेषतः रात्री अपघात घडत आहेत, मागील आठवड्यात याच रस्त्यावर रिक्षा उलटली तर एकदा दुचाकीचा अपघात घडल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.