State Drama Competition from Pune first
State Drama Competition from Pune first 
पुणे

राज्य नाट्य स्पर्धेत पुण्यातून ‘खानदानी’ प्रथम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून ‘वलय नाट्य संस्था, पुणे’ या संस्थेच्या ‘खानदानी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली असल्याचे घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

‘स्वरगांधार संगीत व साहित्य प्रसार, पुणे’ या संस्थेच्या ‘वास इज दास’ या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि ‘ध्यास परफॉरमिंग आर्टस्, पुणे’ या संस्थेच्या ‘राक्षस’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन प्रथम पारितोषिक उन्नती कांबळे (नाटक-खानदानी), द्वितीय पारितोषिक ज्ञानेश मिलारे (नाटक-वास इन दास ), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक शाम चव्हाण (नाटक खानदानी), द्वितीय पारितोषिक तन्मय राऊत (नाटक-पलीकडे), नेपथ्य प्रथम पारितोषिक आदित्य पवार (नाटक-खानदानी), द्वितीय पारितोषिक मनोज देशपांडे (नाटक-फायनल ट्रेप), रंगभूषा प्रथम पारितोषिक मोनाली डाळे (नाटक-वास इज दास), द्वितीय पारितोषिक नरेंद्र वीर (नाटक-खानदानी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अमोद देव (नाटक-केस नं.९९) व अंकिता शिवतरे (नाटक-वास इन दास), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे होतेश जकातदार (नाटक-अनागत), आनंद जोशी (नाटक फायनल ट्रंप), विश्वास रांजणे (नाटक-पुराली माझी बायको), दिलीप वेंगुर्लकर (नाटक-वेडा घोटाळा), दिलीप आंग्रे (नाटक-प्रश्न कायद्याचा आहे), मैथिलो हिरेमठ (नाटक-राक्षस), शिवानी नरवडे (नाटक पलीकडे), प्रिया गुजर- महाडीक (नाटक-केस नं.९९), हेमांगी काळे (नाटक-प्रश्न कायद्याचा आहे), मृण्मयी प्रतिनिधी (नाटक-नेमप्लेट) यांना जाहीर झाले आहे.

भरत नाट्य मंदिर येथे २१ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत तेरा नाट्यप्रयोग सादर झाले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुरेश खानविलकर, संजय टिपुगडे आणि अंजली केतकर यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT