पुणे - अतिनील किरणांच्या वापरातून निर्जंतुकीकरण करताना आनंद मेश्राम.
पुणे - अतिनील किरणांच्या वापरातून निर्जंतुकीकरण करताना आनंद मेश्राम. 
पुणे

अतिनील किरणांनी होणार निर्जंतुकीकरण

सकाळवृत्तसेवा

पुणे - जागोजागी उपलब्ध ‘हॅंड सॅनिटायझर’मुळे हातांचे निर्जंतुकीकरण करता येते. पण सोबत बाळगलेले लॅपटॉप, मोबाईल, बॅग आदी वस्तूंसह फळे, भाज्याचे निर्जंतुकीकरण कसे करायचे, असा प्रश्‍न तुमच्या समोर असेल. तर, आता यासाठी पुण्यातील मेश्राम बंधूंनी अतिनील किरणांवर आधारित एक यंत्र विकसित केले आहे. ज्यामुळे अशा निर्जंतुकीकरणाचा प्रश्‍न चुटकीसरशी सुटणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   

सूक्ष्मजीवांच्या ‘डीएनए’त बिघाड करण्याचे काम अतिनील किरणे करतात. अभियंता असलेल्या श्रीकांत आणि आनंद मेश्राम यांना याची कल्पना नसेल तर नवलच. त्यांनी याचाच आधार घेत ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सुरू केलेल्या ‘व्हीएचआयएल इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ या कंपनीच्या माध्यमातून ‘गो कोरोना वॅन्ड’ या निर्जंतुकीकरण यंत्राची निर्मिती केली आहे. आनंद मेश्राम म्हणाले,‘‘पदार्थांच्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी  अतिनील किरणांवर आधारित यंत्राचा वापर करण्यात येतो. लवकचर या यंत्राचे सर्टिफिकेशन पूर्ण होणार आहे.

यंत्राविषयी दृष्टिक्षेपात

  • फळे ठेवण्यासाठी फ्रिजसारखे आणि हाताने फिरवता येणारे पोर्टेबल अशा दोन प्रकारची यंत्रे.
  • वस्तूवर फिरवताना २ ते ३ सेकंदांचा वेळ आवश्‍यक.
  • सुरक्षिततेसाठी हातात मोजे आणि डोळ्यावर गॉगल्स लावणे आवश्‍यक.
  • लहान मुले आणि डोळ्यांची काळजी घ्यावी.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT