Students should read a lot Dr Kottapalle
Students should read a lot Dr Kottapalle 
पुणे

विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे : डॉ. कोत्तापल्ले

डी के वळसे पाटील

मंचर : “वाचनातून माणसाला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. अनेक गोष्टी समजतात. त्यामुळे माणूस विचार करू लागतो. आजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करण्याची सवय लावली आहे. तुम्हाला शिकविलेले ज्ञान समजून घ्या. तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. नवे प्रश्न तेव्हा निर्माण होतील, जेव्हा आपण वाचायला सुरवात करू’’ असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

फलोदे (ता. आंबेगाव) येथे शहीद राजगुरु ग्रंथालयात 'आम्ही पुणेकर' संस्थेतर्फे 'व्हील फॉर एज्युकेशन' या उपक्रमांतर्गत दुर्गम आदिवासी भागात एकूण 500 सायकली व शालेय शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. यावेळी धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख, उद्योजिका नयना चोपडे, पंडित वसंत गाडगीळ, आम्ही पुणेकर संस्थेचे सचिव हेमंत जाधव, अरविंद जडे, अखिल झांजले, दत्ता गायकवाड, समीर देसाई, अॅड. दिलीप हांडे, डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. प्रियंका जावळे, शरद देशमुख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी 300 पुस्तके देण्यात आली.

डॉ. देशमुख म्हणाले, “शिक्षणासाठी खेड्यातील मुलांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. त्यासाठी नक्की प्रयत्न करू. धर्मदाय आयुक्तालयाकडून दुर्गम आदिवासी भागात मुलांना एक हजार सायकल वाटपाचा प्रकल्प केला आहे. आम्ही पुणेकर संस्थेतर्फे व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमासाठी सायकली कमी पडल्यास मदत केली जाईल''.

हेमंत जाधव म्हणाले, “आम्ही पुणेकर संस्थेच्या व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील तळेघर, राजापूर, पिंपरी, चिखली, फलोदे, जांभोरी, पाटण, आंगणे अशा एकूण 23 गावांची निवड करण्यात आली.  विद्यार्थ्यांसाठी 500 ते 600 सायकली तत्काळ पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सहधमार्दाय आयुक्तांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.’’ सरपंच मनिषा मेमाणे यांनी स्वागत केले. अमोल वाघमारे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT