Students social organizations warn of protest over shooting of rap song in university pune education
Students social organizations warn of protest over shooting of rap song in university pune education SAKAL
पुणे

Pune : विद्यापीठातील ‘रॅप’ गाण्याच्या चित्रीकरणावरून विद्यार्थी, सामाजिक संघटनांचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केलेल्या ‘रॅप’गाण्याचे चित्रीकरण केल्याप्रकरणी संबंधित परवानगी देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर, तसेच सुरक्षा यंत्रणेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. तसेच दोषींवर त्वरीत कारवाई न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असाही इशारा संघटनांनी दिला आहे.

विद्यापीठात ‘रॅप’ गाण्याच्या चित्रीकरणाचे प्रकरण समोर येऊनही प्रशासन चौकशी समितीच्या नावाखाली वेळ काढू पणा करत आहे. संबंधित प्रकरणात दोषींवर त्वरीत कारवाई होणे अपेक्षित असताना दिवस पुढे ढकलले जात आहे, त्यामुळे दोंषीवर त्वरीत कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना दिले आहे.

या शिष्टमंडळात विद्यार्थी विकास मंचचे ॲड. सुरेश खुर्पे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, प्रदेश काँग्रेस लिगल सेलचे ॲड. फैयाज शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत वर्मा, शंकर जमादार, अनिल शेवरे, श्रीनिवास दिसले, वंचित आघाडीचे अतुल झोडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष अमरजित पबमे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत रॅप गाण्याच्या झालेल्या चित्रीकरणाबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘‘विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अथवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. जेणेकरून सध्या सुरू असलेल्या चौकशी दरम्यान नेमलेल्या समितीस दबावमुक्त आणि पारपदर्शकपणे काम करता येईल. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी कामावर उपस्थित असलेल्या सुरक्षा यंत्रणेवर कारवाई करावी. चौकशी समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करून सत्य समोर आणावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.’’

- सुरेश खुर्पे, अध्यक्ष, विद्यार्थी विकास मंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

SCROLL FOR NEXT