Selfie
Selfie 
पुणे

जिवावर बेततेय स्टंटबाजी

मंगेश पांडे

पिंपरी - स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याच्या नादात तरुण मुले जिवाशी खेळत आहेत. भर रस्त्यात, रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओसह फोटोशूट करणारी तरुणाई ठिकठिकाणी दिसून येत आहे. या स्टंटबाजीतून ही मुले स्वतःच्या जिवाबरोबर अन्य वाहनचालकांचा जीवही धोक्‍यात घालत आहेत. या अतिउत्साही मुलांना आवरणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सोशल मीडियावर सध्या स्टंटबाजी करणारे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. त्यामुळे व्हिडिओ बनविण्याची तरुणांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. हे व्हिडिओ तयार करताना जिवाला धोका पोचू शकतो, याबाबत कोणताही विचार तरुणाई करताना दिसत नाही. रस्त्याच्या मधोमध उभे राहून भरधाव वाहनाच्या जवळून जाताना तसेच रेल्वेट्रॅकवर उभे राहून रेल्वे जवळून जातानाचे व्हिडिओ बनविले जात आहेत. व्हिडिओ बनविताना अपघात झाल्याने अनेक जण जिवाला मुकले आहेत. शहरातील रस्त्यांवरही अशाप्रकारे व्हिडिओ तयार करणारी मुले दिसून येतात. चिंचवडमधील सेंट मदर टेरेसा या पुलावर अनेक जण व्हिडिओ चित्रित करतात. रावेत येथील बास्केट पुलासह शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर हे शूटिंग सुरू असते.

तरुणांना राहत नाही भान
स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करताना भरधाव दुचाकी चालविण्यासह तिचा मोठा आवाज केला जातो. याचा इतर वाहनचालकांसह परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिक संताप व्यक्त करतात. मात्र, याचे या तरुणांना भान राहत नाही.

टिकटॉक व्हिडिओची क्रेझ
सध्या टिकटॉक व्हिडिओची क्रेझ आहे. तरुणाईकडून व्हिडिओ बनविण्याचे प्रमाण अधिक आहे. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, ते बनविताना अनेक जण जीव धोक्‍यात घालून व्हिडिओ चित्रित करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT