mpsc
mpsc 
पुणे

रयतच्या परीक्षा केंद्रातील दहा विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत यश

सकाळवृत्तसेवा

मांजरी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत रयत शिक्षण  संस्थेच्या हडपसर येथील एस .एम. जोशी महाविद्यालय स्पर्धा परीक्षा केंद्रातील दहा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे ठिकठिकाणाहून अभिनंदन होत आहे.

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. स्वाती देसाई उपजिल्हाधिकारी, वसीम शेख उपजिल्हाधिकारी, अजय कोकाटे पोलीस उपअधीक्षक, ऋतुजा मोरे नायब तहसीलदार, अभिजीत पाखरे उपकार्यकारी अधिकारी, रोहिणी गायगोपाल असिस्टंट बीडीओ, प्रवीण कुंजीर डी .वाय. एस. पी., अमृता गुंड कक्षाधिकारी, ऋतुजा नाईकवडे इंडस्ट्रियल ऑफिसर टेक्निकल व विजय गायकवाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. 

प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले म्हणाले, "सध्या स्पर्धा परीक्षा केंद्रात ६५० विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. वातानुकूलित अभ्यासिका, मार्गदर्शनपर व्याख्याने, इंटरनेट सुविधा, ग्रंथालय सुविधा, मॉक इंटरव्यू यासारख्या विविध सुविधा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची भूमिका बहुजन उद्धाराची आहे. कर्मवीरांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी बहुजनातील तरुणांनी सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे. आम्ही त्यांच्या विचार आणि कार्याचा वारसा जपणारे आहोत. विद्यार्थ्यांचे यश आम्हाला निश्चित समाधान देणारे आहे. आजच्या तरुणाईने हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिद्द, चिकाटी व अविरत परिश्रम केले पाहिजे.' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, आमदार चेतन तुपे, दिलीप तुपे, अशोक तुपे, प्राचार्य डॉ. बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, डॉ. शकुंतला  सावंत, प्रा. अजित भोसले  यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT