बारावीत नापास झाल्याने निखिल लक्ष्मण नाईक याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
कोथरूड - निखिल लक्ष्मण नाईक, वय 19, रा. श्रावणधारा वसाहत याने बारावीत नापास झाल्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खुपच उत्सुक होता. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच तो इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली. खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे, वय 30 यांच्या अंगावर तो पडला.यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यु झाला. लोणारे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
क्रिकेटची आवड असलेल्या निखिलने बॉडी बनवण्यासाठी जीम सुरू केली होती. तो शांत स्वभावाचा होता. निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे.
निखिलच्या जाण्यामुळे श्रावणधारा वसाहतीमधील महिलांनी दुःख व्यक्त केले. सुरवातील झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहीली आहे. कष्टकरी कुटूंबातील आशेचा किरण असलेला तरूण मुलगा गेल्याने सर्वच महिला भावुक झाल्या होत्या.
इमारतीला जाळी बसवण्याची मागणी
याच इमारतीमधून सहा महिन्यापूर्वी एक पाच वर्षाचे बाळ पडून मृत्यू झाला होता. इमारतीला सुरक्षा जाळी असती तर हे जीव वाचले असते. मोठ्या इमारतीमध्ये सुरक्षा जाळ्या लावल्या तर जाणते अजाणतेपणे होणारी दुर्घटना टळेल असे येथील महिलांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.