Supriya Sule 
पुणे

सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यांची व्यथा

मिलिंद संगई

बारामती शहर - राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. केवळ हाच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली. 

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करुनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, काल दोन अपघात झाले दोघेही लोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार व कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकारदरबारी या निमित्ताने न्याय मागते, असेही सुळे यांनी सांगितले.

जेजुरीनजिक रेल्वे उड्डाणपूलावरुन सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत खड्डयांची परिस्थिती किती भीषण आहे याचे चित्रणच लोकांना दाखविले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान लोकांशी संवाद साधत त्यांनी लोकांच्या भावना चित्रीत केल्या, मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत हे खड्डे त्वरित बुजविण्याबाबत तसेच रस्ता व्यवस्थित करण्याबाबत विनंती केली. नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढत सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय हलगर्जीपणाचा लोकांना किती त्रास होतो हे यातून दाखवून दिले. 

दुष्काळाबाबतही उपाययोजना हव्यात...
पुरंदर तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे, नाझरे धरणातील पाणी साठा वेगाने संपत आहे, अशा स्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत, असेही आवाहन त्यांनी केले. 



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharing Auto Price Hike: मुंबई उपनगरांत रिक्षाचालकांची मनमानी, शेअरिंगचे भाडे वाढले; नवे दर काय?

Panchang 3 August 2025: आजच्या दिवशी सूर्यनारायणास दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा

Friendship Day 2025 Wishes: मित्र वनव्यातील गारव्यासारखा... फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपल्या मित्रांना द्या खास अंदाजात शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक सुंदर संदेश!

आजचे राशिभविष्य - 3 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT